'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली हीना खानची सासू आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:39 PM2024-06-21T16:39:43+5:302024-06-21T16:40:15+5:30

अक्षराची सासू सध्या कुठे असते?

Hina Khan s mother in law from Yeh Rishta Kya Kehlata Hai where Is she now | 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली हीना खानची सासू आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली हीना खानची सासू आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस

'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hain) या गाजलेल्या मालिकेतून नैतिक आणि अक्षराची जोडी प्रसिद्ध झाली होती. करण मेहरा आणि हीना खान यांनी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये अक्षराच्या सासूच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री आठवतेय का? लेकावर जीव ओतणाऱ्या आणि सूनेवरही प्रेम करणाऱ्या प्रेमळ सासूची तिने भूमिका साकारली होती. ती अभिनेत्री सध्या करते तरी काय?

अभिनेत्री सोनाली वर्मा (Sonali Verma) यांनी हिना खान च्या सासूची भूमिका साकारली होती. सोनाली यांनी लग्नासाठी आपलं करिअर थांबवलं आणि त्या कायमच्या परदेशात स्थायिक झाल्याची माहिती आहे. त्यांचे लेटेस्ट फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात त्यांचा बदललेला लूक पाहून अनेकांना विश्वासही बसत नाही. त्यांच्या फॅन पेजवरुन फोटो शेअर करण्यात आले आहेत.

सोनाली यांनी 5 वर्ष मालिकेत काम केलं. नंतर त्यांनी सचिन सचदेवा यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि त्या अमेरिकेला स्थायिक झाल्या. याच कारणाने त्या अभिनयापासूनही दूर गेल्या. सध्या त्या न्यूयॉर्क येथे वास्तव्यास आहेत. परदेशात त्या आयुष्य एन्जॉय करत आहेत. 

अभिनयात येण्याअगोदर सोनाली वर्मा या प्रसिद्ध वृत्तवाहिनीत अँकर म्हणून काम करत होत्या. पत्रकारिता सोडून त्या टीव्ही इंडस्ट्रीत आल्या. अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

Web Title: Hina Khan s mother in law from Yeh Rishta Kya Kehlata Hai where Is she now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.