साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:15 IST2025-06-05T12:14:11+5:302025-06-05T12:15:24+5:30

हिना खानच्या साडीने वेधले सर्वांचे लक्ष, गुलाबी ब्लाऊजने दिला हटके लूक

Hina Khan Marries Rocky Jaiswal Actress Wore Manish Malhotra Saree See Her Bridal Look | साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल!

साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल!

कॅन्सरशी झुंज देणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिनं काल बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली आहे. हिना खाननेलग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अत्यंत साधेपणाने आणि जवळच्या मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं आहे. कोणताही दिखावा किंवा गाजावाजा न करता हिनाने लग्न केलंय. आपल्या खास दिवशी हिनानं सुंदर दिसत होती. लग्नानंतर हिनाचा वेडिंग लूक चर्चेत आला होता.

हिनाने लग्नात पारंपरिक पोशाख परिधान करुन सर्वांचं लक्ष वेधलं. तिने साडी परिधान केली होती. ओपल हिरव्या रंगाची ही हँडलूम साडी खास मनीष मल्होत्रानं डिझाईन केली आहे.  या साडीत हिना वधू म्हणून खूप सुंदर दिसत होती. सोबत गुलाबी रंगाचा दुपट्टा होता.  सोनेरी-चंदेरी धाग्यांचे नक्षीकाम असलेल्या या साडीमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. यासोबत तिने कुंदन ज्वेलरी घातली होती. खास गोष्ट म्हणजे अभिनेत्रीने पदरावर तिचे आणि रॉकीचे नावही कस्टमाइज करुन घेतलं. हिनाचे साडीमधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 


कॅन्सरशी झुंज, रॉकीची साथ

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना घराघरात पोहचली आणि अक्षरा म्हणून ओळख मिळवली. इंडस्ट्रीत हिनानं मेहनत आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर एक खास स्थान निर्माण केलं. आज हिना टीव्हीची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. पण, यशाच्या शिखरावर असताना तिला ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रासलं. तरीही तिनं हार मानली नाही. या काळात रॉकी तिच्या बाजूने नेहमीच खंबीरपणे उभा राहिला. हिना सध्या कॅन्सरशी धैर्यानं लढा देत तर आहेच. शिवाय या आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती सुद्धा करतेय. तिच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर हिना ही ५२ कोटींची मालकीण आहे. ती दरमहा सुमारे ३५ लाख रुपये कमावते. तिच्या उत्पन्नाचा स्रोत केवळ अभिनयच नाही तर ब्रँड एंडोर्समेंट देखील आहे. हिना खानकडे ऑडी ए४, रेनॉल्ट ट्रायबर आणि बीएमडब्ल्यू ५ सिरीज सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. 

Web Title: Hina Khan Marries Rocky Jaiswal Actress Wore Manish Malhotra Saree See Her Bridal Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.