Hina Khan : 'विश्वासघात हे एकमात्र सत्य जे...' हिना खानची पोस्ट वाचून चाहते संभ्रमात, सोशल मीडियावर ब्रेकअपच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 10:17 IST2022-12-07T10:13:46+5:302022-12-07T10:17:32+5:30
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खानच्या एका पोस्टने चाहत्यांना संभ्रमात टाकले आहे.

Hina Khan : 'विश्वासघात हे एकमात्र सत्य जे...' हिना खानची पोस्ट वाचून चाहते संभ्रमात, सोशल मीडियावर ब्रेकअपच्या चर्चा
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खानच्या एका पोस्टने चाहत्यांना संभ्रमात टाकले आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे ज्यात कोणीतरी तिचा विश्वासघात केला असून ती निराश झाल्याचा प्रत्यय येत आहे. यावरुन हिना आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये काही बिनसले तर नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. (Hina Khan Instagram Post)
हिना खान बॉयफ्रेंड 'रॉकी जयस्वाल' सोबत १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्या पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. तिने लिहिले, 'विश्वासघात हे एकमात्र सत्य आहे जे कायम टिकून राहते. तर आणखी एक पोस्ट करत तिने लिहिले 'ज्याने तुमचा विश्वासघात केला त्याच्यावर आंधळा विश्वास केल्यामुळे स्वत:ला माफ करायला विसरु नका. कधी कधी आपलं निर्मळ मन वाईट गोष्टी बघत नाही.' हिना खानच्या अशा पोस्टमुळे सोशल मीडियावर खलबतं सुरु झाली आहेत.
चाहत्यांना असे वाटत आहे की, हिना सध्या त्रासात आहे. कारण तिने आजपर्यंत असे पोस्ट कधी केले नाही. तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते प्रार्थना करत आहेत की या दोघांमध्ये सगळं सुरळित असू देत. चाहते हिना ला आधार देत आहेत. तर काही जण म्हणत आहेत की हा नव्या प्रोजेक्टचा प्रमोशन फंडाही असू शकतो. लवकरच हिना खरे काय आहे ते सांगू शकते.
हिना खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तसेच ती बॉयफ्रेंड रॉकी सोबतचे फोटो शेअर करत असते. हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये साकारलेली अक्षराची भुमिका सगळ्यांच्याच आजही लक्षात आहे. तसेच तिने 'कसोटी जिंदगी की २' मध्ये 'कोमोलिका' व्हिलेनची भुमिकाही साकारली आहे. तसेच हिना पहिली टीव्ही अभिनेत्री आहे जिने 'कान्स फिल्म फेस्टिव्ह'मध्ये प्रतिनिधित्व केले आहे. (Cannes Film Festival)