​रवीना टंडनचा नवा अवतार तुम्ही पाहिला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 08:28 AM2017-09-13T08:28:08+5:302017-09-13T14:38:38+5:30

लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा कार्यक्रम लिप सिंक बॅटल या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर आधारित आहे. ...

Have you seen Raveena Tandon's new avatar? | ​रवीना टंडनचा नवा अवतार तुम्ही पाहिला आहे का?

​रवीना टंडनचा नवा अवतार तुम्ही पाहिला आहे का?

googlenewsNext
प सिंग बॅटल या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा कार्यक्रम लिप सिंक बॅटल या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर आधारित आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच या कार्यक्रमाविषयी सर्वसामान्यांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे.
फराह खान या कार्यक्रमाची सर्वेसर्वा असून या कार्यक्रमात अली असगर तिच्यासोबत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. फराह या कार्यक्रमात असल्याने या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 
लिप सिंग बॅटल या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटींनी चित्रीकरण करायला देखील सुरुवात केली आहे. नुकतेच रवीना टंडनने या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. तिचा चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला होता आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात रवीना प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळाली. रवीनाने या कार्यक्रमासाठी एका नायकासारखी वेशभूषा केली होती. हा नायक तिचा आवडता नायक असून तिने त्याच्यासोबत चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे.
लाडला या चित्रपटात प्रेक्षकांना अनिल कपूर, रवीना टंडन आणि श्रीदेवी यांच्यातील प्रेमत्रिकोण पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील रवीना, अनिल आणि श्रीदेवी या सगळ्यांचीच कामे प्रेक्षकांना खूप आवडली होती. रवीना ही खऱ्या आयुष्यात अनिल कपूरची फॅन आहे. त्यामुळेच लिप सिंग बॅटल या कार्यक्रमात ती त्याच्याच रूपात दिसणार आहे. या कार्यक्रमात राम लखन या चित्रपटातील अनिलच्या व्यक्तिरेखेप्रमाणे तिचा लूक असणार आहे.
अनिल कपूरच्या राम लखन या चित्रपटातील माय नेम इज लखन या गाण्यावर रवीना थिरकणार आहे. फराह खानने नुकताच ट्विटर या अकाऊंटवर फराह आणि रवीनाचा फोटो शेअर केला आहे. यात रवीनाने अनिलसारखे कपडे घातले आहे. त्याच्यासारखी मिशी लावली आहे. तसेच हेअरस्टाईल देखील तशीच केली आहे आणि एवढेच नव्हे तर अनिलसारच्या छातीवर असणाऱ्या केसांप्रमाणे खोटे केस देखील लावले आहेत.
रवीनानंतर आता प्रेक्षकांना पुढच्या भागांमध्ये करण जोहर, परिणिता चोप्रा यांनीदेखील पाहाता येणार आहे. 

Also Read : ​लिप सिंग बॅटलमध्ये फरहान अख्तर दिसला ऋषी कपूर यांच्या भूमिकेत

Web Title: Have you seen Raveena Tandon's new avatar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.