हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारला लागली लॉटरी, CID मधील दयासोबत शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:27 IST2022-04-25T17:26:10+5:302022-04-25T18:27:22+5:30

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज घराघरात लोकप्रिय आहे. यामधील विशाखा-समीरची जोडी ही घराघरात लोकप्रिय झाली होती... पण अभिनेत्री विशाखा सुभेदार ने ही मालिका सोडत सगळ्यांनाच एकच धक्का दिला.

Hasyajatra fame visakha subhedar will share a screen with cid fame Dayanand shetty | हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारला लागली लॉटरी, CID मधील दयासोबत शेअर करणार स्क्रीन

हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारला लागली लॉटरी, CID मधील दयासोबत शेअर करणार स्क्रीन

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज घराघरात लोकप्रिय आहे. यामधील विशाखा-समीरची जोडी ही घराघरात लोकप्रिय झाली होती... पण अभिनेत्री विशाखा सुभेदार ने ही मालिका सोडत सगळ्यांनाच एकच धक्का दिला.महिनाभरापूर्वी विशाखा सुभेदारने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. एक निर्णय या नावाखाली तिनं ही पोस्ट शेअर केली होती...यात तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमातून निरोप घेतल्याचं सांगितलं...पण यानंतर पुढे काय करणार... असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याचं उत्तर समोर आलय...नुकतीच विशाखानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय, यामध्ये ती CID मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी सोबत दिसतेय. हे दोघेही लवकरच एका मराठी सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर करणारेत. विशाखाने हा फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. तोड दो ये दरवाजा, दया… असे तिने म्हटले आहे. दयानंद शेट्टी याने या CID या मालिकेत दयाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील एसीपी प्रद्युमन यांचा दयासाठीचा दया दरवाजा तोड दो हा डायलॉग आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आणि म्हणूनच विशाखाने हा डायलॉग वापरलाय...यावर अनेक कलाकारच्या कमेंट पहायला मिळतायेत. अभिनेत्री सोनालिका जोशीने तिच्या या फोटोवर कमेंट करत “अभिनंदन” असे म्हटले आहे. तर तिच्यासोबत काम केलेल्या अभिनेता समीर चौगुले यांनी मस्तच अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


विशाखाने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आज ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'मस्त चाललंय आमचं', 'येड्यांची जत्रा', 'अरे आवाज कोणाचा', 'झपाटलेला २', 'सासूच स्वयंवर', 'दगडाबाईची चाळ', 'ये रे ये रे पैसा' अशा कितीतरी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. विशाखा आता नाट्यनिमिर्ती म्हणूनही समोर येतेय...तिच्या कुर्रर.. या नाटकाला रसिक प्रेक्षक भरभरुन दाद देतायेत.

Web Title: Hasyajatra fame visakha subhedar will share a screen with cid fame Dayanand shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.