सुप्रसिद्ध अभिनेत्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली "आत्मशुद्धी अन् जीवनात शांती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:47 IST2025-01-27T09:47:12+5:302025-01-27T09:47:25+5:30

जगभरातले श्रद्धाळू महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत.

Haryanvi Dancer Sapna Chaudhary Reached Mahakumbh Mela 2025 In Prayagraj Took Holy Dip At Sangam | सुप्रसिद्ध अभिनेत्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली "आत्मशुद्धी अन् जीवनात शांती..."

सुप्रसिद्ध अभिनेत्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली "आत्मशुद्धी अन् जीवनात शांती..."

Maha Kumbh Mela 2025: सनातन धर्मात कुंभाचं विशेष महत्त्व आहे. सध्या भारतात महाकुंभमेळ्याचं पवित्र आणि धार्मिक वातावरण आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १३ जानेवारी २०२५ पासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. जगभरातले श्रद्धाळू महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. साधूंपासून सामान्य माणसं ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक व्यक्ती प्रयागराजमध्ये पोहचत आहेत. अशातच अभिनेत्री सपना चौधरीने (Haryanvi Dancer Sapna Chaudhary) प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्याला उपस्थिती दर्शवली. 

सपना चौधरी पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभात पोहोचली. तिनं महाकुंभातील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती काळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. सपना हिनं बोटीत बसून संगमची यात्रा केली, त्यानंतर तिनं त्रिवेणी संगमातच स्नान केलं. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही. तर तो आत्म्याला शुद्ध करण्याची आणि जीवनात शांती मिळविण्याची एक संधी देखील आहे. तुमची कुंभ यात्रा सुरक्षित आणि आध्यात्मिकतेने परिपूर्ण होवो". तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 



सपना चौधरी ही सलमान खानच्या 'बिग बॉस' या शोमधून चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. सपनाचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. सपना चौधरी हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आहे. हरियाणवी गाण्यांवरचे तिचे स्टेज शो प्रचंड गर्दी करतात.सपनाने 'वीरे की वेडिंग' या चित्रपटात 'हट जा तौ' या स्पेशल डान्स नंबरद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती अभय देओल स्टारर 'नानू की जानू' या चित्रपटातील 'लव्ह बाइट' आणि 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यांमध्ये दिसली होती.
 

Web Title: Haryanvi Dancer Sapna Chaudhary Reached Mahakumbh Mela 2025 In Prayagraj Took Holy Dip At Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.