साखरपुड्यानंतर अक्षया-हार्दिकचा पहिला रोमँटिक व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:09 IST2022-05-23T19:08:55+5:302022-05-23T19:09:24+5:30
Akshaya deodhar: अक्षया आणि हार्दिक यांनी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अंजली बाई आणि राणादा या भूमिका साकारल्या होत्या.

साखरपुड्यानंतर अक्षया-हार्दिकचा पहिला रोमँटिक व्हिडीओ व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar) आणि हार्दिक जोशी (hardeek joshi). 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत एकत्र काम करुन लोकप्रियता मिळवणाऱ्या या जोडीने अलिकडेच साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. ऑन स्क्रीन एकत्र झळकणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी अशी अनेकांची इच्छा होती. अखेर या दोघांनी साखरपुडा करत अनेक चाहत्यांच्या मनातली इच्छा पूर्ण केली. साखरपुडा झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबतच्या अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्येच अक्षयाने एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी हार्दिकने अक्षया वाढदिवस साजरा केला. या स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर आता अक्षयाने एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहे. तर अक्षयाने डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. या दोघांनीही हा गेटअप चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या विशेष भागासाठी केला होता.
दरम्यान, अक्षया आणि हार्दिक यांनी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अंजली बाई आणि राणादा या भूमिका साकारल्या होत्या. सध्या हार्दिक तुझ्या माझ्या संसाराला काय हवं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.