राणादा-पाठक बाईंनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने महाराष्ट्रीयन पद्धतीनं बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:47 IST2022-12-10T15:41:37+5:302022-12-10T15:47:26+5:30
हा विवाहसोहळा चार दिवस रंगला. पहिले दोन दिवस मेहेंदी, संगीत हे लग्नापूर्वीचे कार्यक्रम थाटामटात पार पडले.

राणादा-पाठक बाईंनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने महाराष्ट्रीयन पद्धतीनं बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल
सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंत लग्नाचे वारे वाहतायेत. टीव्ही जगतातील कलाकारही याला अपवाद नाहीत. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीनं लग्नाच्या बेडीत अडकली. तर टीव्हीवरील राणादानं देखील पाठकबाईंसोबत लग्नगाठ बांधली. या यादीत आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव सामील झालं आहे. तिने आपल्या प्रियकारासोबत गुपचूप नागपूरमध्ये लग्न उरकलं आहे. आता या लग्नाचे फोटो सोशल मीडिायावर व्हायरल होतायेत.
‘हप्पू की उलटन पलटन’फेम कामना पाठकनं अभिनेता संदीप श्रीधरसोबत विवाह केला आहे. नागपूरमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. पारंपारिक मराठी पद्धतीने त्यांनी लग्न केलं. या विवाहसोहळ्याला कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. हा विवाहसोहळा चार दिवस रंगला. पहिले दोन दिवस मेहेंदी, संगीत हे लग्नापूर्वीचे कार्यक्रम थाटामटात पार पडले.
आपला पती अभिनेता संदीप श्रीधरबाबत सांगताना कामना म्हणाली, “आम्ही अनेक वर्षांपासून रंगभूमीच्या माध्यमातून एकमेकांना ओळखत होतो आणि आमच्यामध्ये चांगली मैत्री देखील होती, ज्यानंतर आमच्यामध्ये प्रेम बहरू लागले. आम्हा दोघांना आमच्या कलेप्रती प्रेम व आवड आहे, ज्यामुळेच आम्ही एकत्र आलो. असे म्हणतात की विवाहाच्या वेळी घाबरायला होते, नर्व्हस वाटते. पण मी स्वत:ला वधूच्या पोशाखामध्ये पाहिले आणि सर्व भिती निघून गेली. तो देखील माझ्या स्वप्नातील राजकुमारासारखा दिसत होता. आम्ही पती-पत्नी म्हणून आमच्या नवीन जीवनप्रवासाला सुरूवात करण्यास खूपच उत्सुक आहोत. संदीप खूप काळजी घेणारा व प्रोत्साहन देणारा आहे. मी माझा जीवनसोबती म्हणून माझा जिवलग मित्र असल्याने स्वत:ला नशीबवान मानते.’’