गुणरत्न सदावर्तेंची 'बिश्नोई' समाजावर प्रतिक्रिया, बॉलिवूडविषयी म्हणाले, "अंडरवर्ल्डच्या छत्रछायेखाली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 18:17 IST2024-10-16T18:16:15+5:302024-10-16T18:17:00+5:30
सलमान खानने काय करावं? गुणरत्न सदावर्तेंनी काय सल्ला दिला वाचा.

गुणरत्न सदावर्तेंची 'बिश्नोई' समाजावर प्रतिक्रिया, बॉलिवूडविषयी म्हणाले, "अंडरवर्ल्डच्या छत्रछायेखाली..."
बिग बॉस १८ (Bigg Boss 18) मधून नुकतेच वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) बाहेर पडले आहेत. घरात जाऊन त्यांनी सर्वांचं चांगलंच मनोरंजन केलं. आता हायकोर्टातील एका केसमुळे त्यांना बाहेर यावं लागलं. सुनावणीनंतर ते पुन्हा घरात जातील अशीही शक्यता आहे. दरम्यान घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बाबा सिद्दीकींची हत्या, सलमानच्या जीवाला धोका या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत गुणरत्न सदावर्तेंना बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यावर ते म्हणाले, "बाबा सिद्दीकींच्या आयुष्याविषयी मला फार काही माहीत नाही. पण मी एवढंच सांगेन की बॉलिवूड कलाकारांनी, सिनेविश्वाने कधीही अंडरवर्ल्डच्या छत्रछायेखाली जाऊ नये. त्यांच्याशी संबंध ठेवू नका. त्यांच्यापासून दूर राहा. कारण तुम्ही लोकांच्या मनात आहात तर अंडवर्ल्ड लोकांना त्रास देण्याचं काम करतात. म्हणून हा दुरावा नक्की ठेवा. जे जे हा दुरावा ठेवतील ते सुखी आयुष्य जगतील. सलमान, शाहरुख, गोविंदा, कंगना सगळेच कलाकार चांगले आहेत.
तसंच सलमान खानला काय सल्ला द्याल? यावर ते पुढे म्हणाले, "मला वाटतं त्यांनी थोडं कायद्यासोबतच धर्मगुरुंसोबतही बोलावं. त्यांच्याकडून सल्ला घ्यावा. प्रभू श्रीरामाच्या आदर्शावर आपण सगळे चालतो. बिश्नोई समाजही हिंदू राष्ट्र मानणारा आहे. त्यामुळ नक्कीच काहीतरी चांगलं होईल. सलमान आमच्याकडे आला तर नक्कीच मी आणि जयश्री त्याच्यासाठी चर्चा करु."