'तारक मेहता'मधील या अभिनेत्रीला ओळखलं का? कॉलेजजीवनातील फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:24 IST2022-08-29T16:24:02+5:302022-08-29T16:24:30+5:30
Taarak mehta ka ooltah chashmah: सध्या मालिकेतील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंही कठीण असल्याचं लक्षात येतं.

'तारक मेहता'मधील या अभिनेत्रीला ओळखलं का? कॉलेजजीवनातील फोटो होतोय व्हायरल
छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेली आणि तितकीच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यामुळे आज १४-१५ वर्ष उलटून गेल्यानंतरही या मालिकेची क्रेझ कमी झालेली नाही. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो. त्यामुळे या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात सध्या मालिकेतील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंही कठीण असल्याचं लक्षात येतं.
या मालिकेतील माधवी भाभी, दयाबेन, अंजली, बबिता, कोमल भाभी आणि सोढी भाभी या स्त्री भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींची चर्चा असते. सध्या या अभिनेत्रींपैकीच एकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कोमल भाभी आहे. या फोटोत त्या कमालीच्या बारीक दिसत असल्यामुळे त्यांना ओळखणं तसं कठीण झालं आहे. या मालिकेत कोमल भाभी ही भूमिका अभिनेत्री अंबिका रंजनकर यांनी साकारली आहे.
अंबिका रंजनकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहायचा प्रयत्न करत असतात. यात अनेकदा त्या त्यांचे जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटोदेखील त्यांनीच शेअर केला आहेत. यात त्यांनी पंजाबी ड्रेस घातला असून डोक्यावर ओढणी घेतली आहे.
दरम्यान, अंबिका यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा व्यतिरिक्त अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्या कलाविश्वात सक्रीय असून त्यांना तारक मेहतामुळे खरी ओळख मिळाली.