Guess The Name: टोपी घातलेल्या या मुलाला ओळखलं का? आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा कॉमेडियन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:08 PM2022-05-12T12:08:26+5:302022-05-12T12:09:51+5:30

Kapil sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो २८ वर्ष जुना आहे.

guess the star name cap on head innocent face do you recognize kapil sharma in his childhood photo | Guess The Name: टोपी घातलेल्या या मुलाला ओळखलं का? आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा कॉमेडियन

Guess The Name: टोपी घातलेल्या या मुलाला ओळखलं का? आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा कॉमेडियन

googlenewsNext

बालपणीच्या आठवणी म्हणजे प्रत्येकाकडे असलेला अनमोल खजिना असतो. या आठवणींची किंमत कशातच करता येत नाही. त्यामुळेच प्रत्येक जण आपल्या जुन्या आठवणी जपून ठेवत असतो. यामध्येच अनेक सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो वा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपले अनमोल क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच सध्या एका प्रसिद्ध कॉमेडियनच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. हा कॉमेडियन आज लोकप्रिय आर्टिस्ट असून सर्वात महागडा विनोदवीर म्हणून ओळखला जातो. 

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने कॅप्टनची टोपी घातली असून त्याच्यासोबत त्याचा भाऊ दिसून येत आहे. परंतु, या फोटोमध्ये दिसणाऱ्या या मुलाकडे पाहिल्यानंतर त्याला ओळखणं अगदी अशक्य आहे. 

फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी असून प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा आहे. विशेष म्हणजे कपिल आज लोकप्रिय कॉमेडियन आहे. इतकंच नाही तर सर्वात महागडा कॉमेडियन म्हणूनही तो ओळखला जातो. व्हायरल होत असलेला त्याचा हा फोटो २८ वर्ष जुना आहे.

दरम्यान,  कपिल आज प्रत्येक घरात लोकप्रिय आहे. त्यामुळेच त्याचा द कपिल शर्मा शो हा कार्यक्रमदेखील टीआरपीमध्ये कायम अव्वल स्थानावर असतो. या शोमध्ये विनोदासोबतच अनेक चित्रपटांचं प्रमोशनही करण्यात येतं.

Web Title: guess the star name cap on head innocent face do you recognize kapil sharma in his childhood photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.