'गोव्याच्या किनाऱ्यावर' फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच हलणार पाळणा, सोशल मीडियावर दिली गुडन्यूज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:32 IST2025-12-24T10:32:09+5:302025-12-24T10:32:51+5:30
'Govyachya Kinaryavar' Fame Siddhi Patne Announces Pregnancy: मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री आणि 'गोव्याच्या किनाऱ्यावर' या सुपरहिट गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सिद्धी पाटणे हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिद्धी लवकरच आई होणार असून तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

'गोव्याच्या किनाऱ्यावर' फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच हलणार पाळणा, सोशल मीडियावर दिली गुडन्यूज!
मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री आणि 'गोव्याच्या किनाऱ्यावर' या सुपरहिट गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सिद्धी पाटणे हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिद्धी लवकरच आई होणार असून तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सिद्धी पाटणे हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात लहान मुलाचे शूज पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. तिने पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले की, एक छोटासा प्रकाशकिरण लवकरच आपल्या आयुष्यात येणार आहे. ही पोस्ट शेअर होताच तिच्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिद्धी पाटणेने २०२१ साली आर्किटेक्ट विशाल दलालसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षांनंतर हे जोडपे लवकरच पालक होणार आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या या गुडन्यूजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
वर्कफ्रंट
सिद्धी पाटणेने 'गोव्याच्या किनाऱ्यावर' या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या गाण्यातून सिद्धी पाटणे हिने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. 'गोव्याच्या किनाऱ्यावर' नंतर तिने इतरही काही म्युझिक अल्बम्स आणि मराठी गाण्यांमध्ये काम केले आहे. सिद्धीने मालिका आणि चित्रपटातूनही काम केले आहे. प्रेमा तुझा रंग कसा, विठू माऊली, श्री गुरुदेवदत्त, सांग तू आहेस का अशा वेगवेगळ्या मालिकांमधून तिने अभिनय साकारला आहे. श्री गुरुदेव दत्त या मालिकेत सिद्धीला पार्वतीची आव्हानात्मक भूमिका तिने साकारली होती. ‘ सांग तू आहेस का’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून ती शांभवीच्या भूमिकेत झळकली. शिवाय मधल्या काळात काही ज्वेलरीसाठी तिने मॉडेलिंग देखील केले आहे.