सोनेरी रंगाची साडी अन् मंगळसूत्राचं ब्रेसलेट! जानकी-ऋषिकेशच्या वेडिंग लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:13 IST2024-07-26T12:13:14+5:302024-07-26T12:13:49+5:30

स्टार प्रवाहवर ऋषिकेश - जानकीचा लग्नाची धामधूम बघायला मिळणार आहे. यावेळी दोघांच्याही वेडिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय (gharoghari matichya chuli)

gharoghari matichya chuli serial Janaki Rishikesh wedding look photos viral | सोनेरी रंगाची साडी अन् मंगळसूत्राचं ब्रेसलेट! जानकी-ऋषिकेशच्या वेडिंग लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो

सोनेरी रंगाची साडी अन् मंगळसूत्राचं ब्रेसलेट! जानकी-ऋषिकेशच्या वेडिंग लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऋषिकेश-जानकीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. ऋषिकेश - जानकी यांच्या लग्नाच्या भागांचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी जानकी - ऋषिकेशच्या संगीत सेरेमनीचे फोटो व्हायरल झाले. यावेळी दोघेही धमाल डान्स करताना दिसले. आता ऋषिकेश - जानकीच्या विवाहसोहळ्याची सर्वांना उत्सुकता असून दोघांच्याही वेडिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय. 

ऋषिकेश-जानकीच्या वेडींग लूकने वेधलं लक्ष

मेहंदी, हळद आणि संगीत थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती विवाहसोहळ्याची. जानकी-ऋषिकेशने लग्नात सोनेरी रंगाच्या पेहरावाला पसंती दिली आहे. सोनेरी रंगाची साडी आणि मोत्याचे दागिने परिधान करत जानकी वधूच्या रुपात नटलीय. तर तिकडे ऋषिकेशचाही सोनेरी रंगाचा पेहराव लक्ष वेधून घेत आहे. जानकीसाठी खास मोत्याचं मंगळसूत्रही डिझाईन करण्यात आलं आहे, खास बात म्हणजे ऋषिकेशने जानकीच्या नावाचं अगदी मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट घातलंय. 



रेश्मा शिंदे वेडींग लूकबद्दल काय म्हणाली?

विवाहसोहळ्यातल्या या लूकविषयी सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, ‘गेल्या दहा-बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे. आम्हा कलाकारांसोबतच सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखिल कसरत सुरु आहे. प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात. आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचच कौतुक. जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल. मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. त्यासाठी नक्की पहा घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: gharoghari matichya chuli serial Janaki Rishikesh wedding look photos viral