गौतमी पाटीलने उरकलं लग्न? डोक्याला मुंडावळ्या अन् हातात हिरवा चुडा; नवरदेव पाहून चाहते थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:22 IST2026-02-18T11:03:44+5:302026-02-18T13:22:21+5:30

"ओंकार रावांचं नाव घेते..." गौतमी पाटील चढली बोहल्यावर? पाहा व्हायरल व्हिडीओ

Gautami Patil Wedding Video With Maharashtrachi Hasyajatra Fame Omkar Raut Truth Behind Gacchi Song | गौतमी पाटीलने उरकलं लग्न? डोक्याला मुंडावळ्या अन् हातात हिरवा चुडा; नवरदेव पाहून चाहते थक्क!

गौतमी पाटीलने उरकलं लग्न? डोक्याला मुंडावळ्या अन् हातात हिरवा चुडा; नवरदेव पाहून चाहते थक्क!

गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच लोकप्रिय आहे. आपल्या दिलखेचक अदा आणि अप्रतिम नृत्य कौशल्याने तिने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. तरुण वर्गामध्ये गौतमी पाटीलची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तरुण मंडळी उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या लग्नाविषयी नेटकऱ्यांमध्ये जास्त चर्चा रंगते. गौतमी लग्न कधी करणार? हे आणि असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतात. अशातच गौतमीचा एका नव्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

गौतमीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यात ती चक्क नवरीच्या रुपात दिसत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओत तिच्यासोबत नवरदेवही दिसत आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार राऊत आहे. व्हायरल व्हिडीओ गौतमीने डोक्याला मुंडावळ्या बांधल्या असून हातात हिरवा चुडा भरला आहे. 

इतकंच नाही, तर तिने ओंकार राऊतसाठी एक हटके उखाणाही घेतला आहे. "ना वायफाय... ना इंटरनेट... गच्चीवर झाली आमची पहिली भेट; ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट". हा व्हिडीओ पाहिल्यानंतर गौतमीने गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र, चाहत्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण गौतमीने खरोखर लग्न केलेलं नाही. गौतमी आणि ओंकारचा हा लूक त्यांच्या खऱ्या लग्नाचा नसून एका गाण्याच्या शूटिंगचा भाग आहे. गौतमीच्या नव्या गाण्याचं नाव 'गच्ची' असं आहे. 

गौतमीची सिनेसृष्टीत एन्ट्री

गौतमीच्या करिअरची गाडी सध्या सुसाट धावतेय. याआधी गौतमी लोकप्रिय गायक अभिजित सावंतबरोबरही झळकली होती. 'रुपेरी वाळूत' या गाण्याच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच एकत्र आले होते. गौतमी आणि अभिजीत यांचे 'रुपेरी वाळूत' हे गाणे ५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आले. गौतमी ही फक्त मराठी सिनेमांत तिचे डान्स परफॉर्मन्स करत नाहीये, तर ती रिॲलिटी शोमध्ये झळकली आहे. स्टार प्रवाहवरील 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमातही गौतमी सहभागी झाली होती. शिवाय, झी मराठीच्या 'देवमाणूस मधला अध्याय' या मालिकेत तिनं खास लावणी सादर केली होती. त्यात ती लावणीसह अभिनय करतानाही दिसली होती. आता ओंकार राऊतसोबतच्या 'गच्ची' या गाण्यातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.


Web Title : गौतमी पाटिल की शादी का सरप्राइज: वायरल वीडियो से प्रशंसक हैरान!

Web Summary : अभिनेता ओंकार राउत के साथ गौतमी पाटिल का शादी का वीडियो वायरल, प्रशंसक उत्साहित। यह एक गाने की शूटिंग का हिस्सा है, 'गच्ची', जहाँ वह अभिनय कर रही हैं। पाटिल 'रूपेरी वालुत' जैसे शो और गानों में दिख रही हैं।

Web Title : Gautami Patil's wedding surprise: Fans stunned by viral video!

Web Summary : Gautami Patil's wedding video with actor Omkar Raut went viral, sparking fan frenzy. It's from a song shoot, 'Gacchi,' where she is acting. Patil is gaining popularity, appearing in shows and songs like 'Ruperi Valut'.