सबसे कातिल गौतमी पाटीलची 'देवमाणूस' मालिकेत दमदार एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:51 IST2025-06-08T10:48:49+5:302025-06-08T10:51:00+5:30
नृत्यांगना गौतमी पाटीलची छोट्या पडद्यावर जबरदस्त एन्ट्री; अभिनयानं जिंकणार चाहत्यांची मनं

सबसे कातिल गौतमी पाटीलची 'देवमाणूस' मालिकेत दमदार एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खुश
Gautami Patil : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या मालिकेचा मधला अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात आता देवमाणूसा मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. प्रसिद्ध लावण्यवती, नृत्यांगना गौतमी पाटीलची (Gautami Patil) 'देवमाणूस' मालिकेत वर्णी लागली आहे. या मालिकेद्वारे गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
दरम्यान, श्वेता शिंदेच्या "देवमाणूस मधला अध्याय" या मालिकेत गौतमीला अभिनयाची संधी देण्यात आली आहे. डॉ अजितकुमार देवला तिच्या नखरेल अदांनी घायाळ करण्यासाठी गौतमी मालिकेत एन्ट्री घेत आहे. नुकताच झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर देवमाणूस मालिकेचा आगामी प्रोमोची झलक दाखवण्यात आली आहे. "सबसे कातिल' गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार?", असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये गौतमीचा पाटील पाहायला मिळते. आपल्या नृत्य आणि अदाकारिने भल्याभल्यांना घायाळ करणारी गौतमी आता अभिनयच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
दरम्यान, यापूर्वी गौतमीने व्हिडीओ अल्बम 'घुंगरू' तसेच काही चित्रपटांमध्ये झळकली आहे. त्याचबरोबर अलिकडेच गौतमीने स्टार प्रवाहच्या रिऍलिटी शो 'होऊ दे धिंगाणा'मध्ये हजेरी लावली होती. त्यात आता 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग रिएलिटी शोमधून गौतमी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर तिला अभिनय करताना चाहते सुद्धा उत्सुक झाले आहेत.