स्टेजवर थिरकणारी गौतमी पोहोचली थेट अनाथाश्रमात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:45 IST2025-12-19T10:45:16+5:302025-12-19T10:45:38+5:30
गौतमीने नुकतीच एका अनाथाश्रमाला भेट दिली. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गौतमीवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्टेजवर थिरकणारी गौतमी पोहोचली थेट अनाथाश्रमात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
Gautami Patil Visit Orphanage : सबसे कातील गौतमी पाटील... लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलची महाराष्ट्रात खूप क्रेझ आहे. गौतमी गावागावात जाऊन लावणी नृत्याचे कार्यक्रम सादर करते. गौतमीला या कार्यक्रमांमधून कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. गावागावातील तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. मात्र या गर्दीत लोक गोंधळ घालतात, राडा करतात अशा दरवेळी बातम्या येतात. अनेकदा गौतमीला ट्रोलही केलं जातं. पण, सध्या गौतमीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
गौतमीने नुकतीच एका अनाथाश्रमाला भेट दिली. या भेटीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गौतमीवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, तिच्यातील संवेदनशील माणूस प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिथल्या लहान मुलींनी गौतमीला प्रेमाने कडकडून मिठी मारली. गौतमीनेही त्यांना जवळ घेत मायेने विचारपूस केली.
गौतमीच्या या व्हिडीओवर "तुझ्या हातून असं सामाजिक कार्य कायम घडत राहो", "लोकांना फक्त नाच दिसतो; पण नाण्याची दुसरी बाजूही असते", "खूप सुंदर" अशा कमेंट करत अनेकांनी तिचं कौतुक केलं. सध्या गौतमीला अनेक मराठी सिनेमांमध्येही डान्स नंबर करण्याची संधी मिळत आहे. एकूणच तिचं करिअर आता सुसाट आहे. अलिकडेच ती गायक अभिजीत सावंतच्या 'रुपेरी वाळूत' अल्बममध्ये झळकली.