'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलचा डान्स, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ पाहून चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:35 IST2025-09-03T18:34:29+5:302025-09-03T18:35:41+5:30
गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलचा डान्स, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ पाहून चाहते फिदा
लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. गौतमीच्या कार्यक्रमांनाही चाहते प्रचंड गर्दी करताना दिसतात. गौतमी तिच्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकून घेते. गौतमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावरही ती रील व्हिडीओ बनवते. आता गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी ती तिच्या स्टेजवरील डान्समुळे नाही, तर एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
गौतमीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती 'टीप टीप बरसा पाणी' या गाण्यावर स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गौतमीचा हा डान्स व्हिडीओ पाहून चाहते तिच्या अदा आणि सौंदर्याचे भरभरून कौतुक करत आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिला 'मराठीची बिपाशा बसू' अशी उपमा दिली आहे. गौतमी नेहमीच तिच्या ठसकेबाज नृत्यामुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी पाटील एका डान्स शोसाठी तब्बल ३ ते ५ लाख रुपये मानधन घेते. तिच्या टीमची महिन्याची कमाई सुमारे ४५ ते ५० लाख असल्याचा अंदाज वर्तवला जातो. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या छोट्याशा गावातून आलेली गौतमी सुरुवातीला बॅकडान्सर म्हणून काम करत होती. मात्र, तिच्या मेहनतीने आणि टॅलेंटमुळे तिने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता ती फक्त नृत्यांगणा नसून, अभिनयाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. 'देवमाणूस' या मालिकेतही तिने विशेष भूमिका साकारली होती. तसेच 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग रिएलिटी शोमधून गौतमी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.