गौतमी-स्वानंद या ठिकाणी करताहेत हनीमून एन्जॉय, व्हिडीओ आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:12 IST2024-01-02T14:11:37+5:302024-01-02T14:12:31+5:30
अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिने २५ डिसेंबर, २०२३ रोजी स्वानंद तेंडुलकर(Swanand Tendulkar)सोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या ते हनीमून एन्जॉय करताना दिसत आहेत.

गौतमी-स्वानंद या ठिकाणी करताहेत हनीमून एन्जॉय, व्हिडीओ आले समोर
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिने नुकतेच स्वानंद तेंडुलकर(Swanand Tendulkar)सोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नातील मेहंदी, हळद, लग्न आणि रिसेप्शनचे फोटो चांगलेच चर्चेत आले होते. लग्नानंतर ते दोघे हनीमूनला कुठे जाणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. तर ते दोघे हनीमूनसाठी कोकणात गेले आहेत. मालवणमधील देवबागमध्ये एका रिसॉर्टमध्ये ते थांबले आहेत. तिथले व्हिडीओ आणि फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर सध्या देवबागमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत. यावेळी निसर्गाचा आस्वाद घेण्यासोबत तिथे वॉटर स्पोर्ट करताना दिसले. गौतमीने पाण्यात फ्लाय बोर्डिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
असे जुळले सूर...
गौतमी आणि स्वानंद यांचे लव्ह मॅरेज असून पहिल्याच भेटीत गौतमीने स्वानंदला नकार दिला होता. परंतु, त्याच्यासोबत मैत्री झाल्यानंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. त्यांच्या या प्रेमाचा प्रवास तिने लग्नातील एका व्हिडीओमध्ये सांगितला आहे. स्वानंद म्हणाला की, खूप प्रामाणिकपणे सांगतो. मुळातच पाहताक्षणी ती मला आवडली होती. हे तिला मी कधी सांगतलं नव्हतं पण आता ही गोष्ट सांगतोय. तिला पाहिल्यावरच मी विचारलं होतं की, मी डेट करु शकतो का? तर ती नाही म्हणाली. त्यावर, थोडीशी मैत्री वाढली, बोलणं वाढलं. त्याच्यानंतर तो मला जास्त आवडायला लागला. आणि, नंतर मग कळलं की, हे सगळं मस्त चाललंय, छान आहे हे सगळं. खूप गोड आहे, असं गौतमी म्हणाली.
वर्कफ्रंट..
गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर ही जोडी सध्या लोकप्रिय ठरत आहे. गौतमी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'माझा होशील ना' या मालिकेनंतर सध्या ती 'गालिब' या नाटकात काम करत आहे. तर, स्वानंद तेंडुलकर मराठीतील पहिलं डिजिटल चॅनल 'भाडिपा'चा बिझनेस हेड आहे. तसेच भाडिपाच्या विविध व्हिडीओ आणि सीरिजमध्येही तो अभिनयही करताना दिसला आहे. सोशल मीडियावर त्याचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे.