”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 14:03 IST2021-01-30T13:59:34+5:302021-01-30T14:03:28+5:30

गौतमीने कमीवेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Gautami deshpande shared gamorous photoshoot | ”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे नवं फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये गौतमी वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. गौतमीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहे. गौतमी निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमीवेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत 
अभिनयात पदार्पण अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.अभिनयाशिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमी गाण्याचा वारसा तिला तिच्या आजीकडून आला आहे.
 

Web Title: Gautami deshpande shared gamorous photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.