फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 01:18 PM2021-05-31T13:18:15+5:302021-05-31T13:24:01+5:30

आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Gautami deshpande share her photos with sister mrunmayee deshpande | फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या

फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या

googlenewsNext

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपलं स्थान निर्माण करतायेत. 
आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत..मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण गौतमीने सुध्दा मालिका विश्वात आापल्या अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात सर्वांतच असं वेगळं स्थान निर्माण केलं. गौतमीने मृण्मयीच्या वाढदिवसानिमित्त दोघींच्या फोटोचा कॉलाज शेअर केला आहे. या दोघांच्या बालपणीचा फोटोही आहेत. या  फोटोत दोघी खूपच गोड दिसतायेत. 


 मृण्मयीने अग्निहोत्र या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे. मृण्यमयीने फर्जद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती.मृण्मयी एक यशस्वी दिग्दर्शिका सुध्दा बनलीय. तर गौतमी साकारत असलेली माझा होशील ना या मालिकेतील सई सुध्दा प्रचंड गाजतेय.

गौतमी एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिका सुध्दा आहे. झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. 

Web Title: Gautami deshpande share her photos with sister mrunmayee deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.