ना मालदीव, ना पॅरिस-लंडन..., लग्नानंतर कोकणच्या समुद्रकिनारी गौतमी-स्वानंद करताय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 15:13 IST2023-12-29T15:12:54+5:302023-12-29T15:13:49+5:30

कोकणातून त्यांचे काही खास फोटो समोर आलेत. 

Gautami Deshpande and Swanand Tendulkar in Konkan | ना मालदीव, ना पॅरिस-लंडन..., लग्नानंतर कोकणच्या समुद्रकिनारी गौतमी-स्वानंद करताय एन्जॉय

कोकणच्या समुद्रकिनारी गौतमी-स्वानंद करताय एन्जॉय

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. त्यामुळे सध्या ही जोडी चर्चेत आहे. गौतमीच्या लग्नातील मेहंदी सोहळ्यापासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. लग्नानंतर दोघेही मालदीव, लंडन, न्यूयॉर्क नाही तर कोकणात फिरायला गेले आहेत. कोकणातून त्यांचे काही खास फोटो समोर आलेत. 

कोकणातील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने गौतमी आणि स्वानंदचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  तिने शेअर केलेल्या विविध व्हिडीओ आणि फोटोंमध्ये स्वानंद-गौतमी ही ट्रिप एन्जॉय करताना दिसले.

 

अंकिताने स्वानंद-गौतमीचा एक गोड फोटो शेअर केला. तर कॅप्शनमध्ये तिने  'Cuties' असे लिहले. तसेच या जोडीने कोकणातील वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेतल्याचे दिसून आले. 

गौतमी आणि स्वानंद यांची जोडी सध्या लोकप्रिय ठरत आहे. गौतमी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'माझा होशील ना' या मालिकेनंतर सध्या ती 'गालिब' या नाटकात काम करत आहे. तर, स्वानंद तेंडुलकर मराठीतील पहिलं डिजीटल चॅनल 'भाडिपा'चा बिझनेस हेड आहे. तसेच  भाडिपाच्या विविध व्हिडीओ आणि सीरिजमध्येही तो अभिनयही करताना दिसला आहे. सोशल मीडियावर त्याचाही मोठा चाहतावर्ग आहे. 

Web Title: Gautami Deshpande and Swanand Tendulkar in Konkan