अक्षय खन्नासारखी हेअरस्टाइल आणि त्याच्यासारखाच डान्स, 'धुरंधर'मधील FA9LA गाण्यावर गौरव मोरेने बनवला रील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:22 IST2025-12-10T11:22:18+5:302025-12-10T11:22:38+5:30
अक्षय खन्नाच्या FA9LA या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर FA9LA हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे यानेदेखील FA9LA गाण्यावर रील बनवला आहे.

अक्षय खन्नासारखी हेअरस्टाइल आणि त्याच्यासारखाच डान्स, 'धुरंधर'मधील FA9LA गाण्यावर गौरव मोरेने बनवला रील
बऱ्याच दिवसांनी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचं राज्य आलं आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने प्रदर्शित होताच धुव्वा उडवला आहे. या सिनेमातील सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर अक्षय खन्नाच्या FA9LA या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर FA9LA हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालं आहे. या गाण्याची तुलना अॅनिमलमधील जमाल कुडू या गाण्याशी होत आहे. अनेक सेलिब्रिटींनाही FA9LA गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता येत नाहीये.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे यानेदेखील FA9LA गाण्यावर रील बनवला आहे. एका फंक्शनमध्ये असताना गौरवने हा ट्रेंड फॉलो केला आहे. अक्षय खन्नासारखीच हेअरस्टाइल आणि त्याच्यासारखाच डान्स करत गौरव एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. गौरवने त्याच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, 'धुरंधर' सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, सारा अर्जुन अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे.