Gaurav More : गौरव मोरे आहे की शाहरुख खान; फोटो पाहून चाहते पडले गोंधळात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:07 IST2022-12-04T16:18:14+5:302022-12-06T15:07:54+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे आज महाराष्ट्रातला एक स्टार च झाला आहे. विनोदातील अचुक टायमिंगने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे.

Gaurav More : गौरव मोरे आहे की शाहरुख खान; फोटो पाहून चाहते पडले गोंधळात
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे (Comedy Actor) आज महाराष्ट्रातला एक स्टार च झाला आहे. विनोदातील अचुक टायमिंगने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. यामुळेच गौरवच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीए. आता काय तर चाहत्यांनी थेट बॉलिवुडच्या 'बादशाह'सोबत गौरवची तुलना केली आहे.
गौरवच आहे की शाहरुख खान
नुकताच गौरव ने इन्स्टाग्राम एअरपोर्टवरचा एक फोटो शेअर केला.यामध्ये तो पाठमोरा दिसत असून काचेतुन तो विमानाकडे पाहत असल्याचं दिसत आहे. 'चल कही दूर निकल जाए' असं त्याने कॅप्शन दिले आहे. गौरव ची हेअरस्टाईल तर आपल्याला माहितच आहे. झालं तर मग गौरव चा हो फोटो पाहून चाहत्यांना एकदम शाहरुखचीच झलक वाटली. त्यामुळे गौरव आहे का शाहरुख खान या संभ्रमात चाहते सापडले.
Akshaya Deodhar-Hardik Joshi : 'सदा सौभाग्यवती भव:!' अक्षया देवधरच्या फोटोशुटचीच हवा
शाहरुख खानचे पठाण सिनेमाचे टीझर प्रदर्शित झाले आहे. त्यात शाहरुखचा लुक खुपच पसंत केला जातोय. याच लुकशी मिळताजुळता गौरवचा फोटो असल्याचं चाहते म्हणत आहेत. गौरवसाठी ही फारच मोठी कॉम्प्लिमेंट असणार हे नक्की.