रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:39 IST2025-12-12T13:38:46+5:302025-12-12T13:39:27+5:30
कृतिका कामरा आणि गौरव कपूर नुकतेच मुंबईत फिल्म स्क्रीनिंगसाठी आले होते.

रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
टीव्ही अभिनेत्री कृतिका कामराने क्रिकेट होस्ट गौरव कपूरसोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली. कृतिका आणि गौरव गेल्या काही दिवसांपासून डेट करत आहेत. कालच कृतिकाने गौरवसोबत ब्रेकफास्ट डेटचे फोटो शेअर केले. यानंतर दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. या खुलाश्यानंतर कृतिका आणि गौरव पहिल्यांदाच एकत्र दिसले.
कृतिका कामरा आणि गौरव कपूर नुकतेच मुंबईत फिल्म स्क्रीनिंगसाठी आले होते. यावेळी पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. कृतिकाने ऑफ शोल्डर वेलवेट टॉप आणि निळी जीन्स घातली आहे. तिने ग्लॅम मेकअपही केलेला दिसत आहे. तर गौरव कपूर टीशर्ट-जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये आहे. दोघंही कॅमेऱ्यासमोर हसत आहेत. एकमेकांशी बोलतही आहेत. दोघांची जोडी एकदम शोभून दिसत आहे. 'फिल्मीमंत्रा'च्या पेजवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांनी 'क्युट जोडी','तुमच्यासाठी आम्ही खूश आहोत' अशा कमेंट्स केल्या आहेत. गौरव कपूरने याआधी किरत भट्टलसोबत लग्न केलं होतं. २०१४ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. तर २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाचं कारण मात्र समोर आलं नाही.
कृतिका कामरा आगामी 'द ग्रेट शमशुद्दीन फॅमिली' सिनेमात दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी आलेली तिची 'ग्यारह ग्यारह' सीरिज गाजली. आता याच्या दुसऱ्या पार्टची सर्वांना उत्सुकता आहे.