Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 18:59 IST2025-08-24T18:58:52+5:302025-08-24T18:59:23+5:30
सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होण्याऱ्या गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान होतात. यावर्षीही सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती त्याच्या घरी आणली आहे. याचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत शिव बाप्पाला घरी घेऊन जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गणरायाच्या मूर्तीने लक्ष वेधून घेतलं आहे. शिवच्या घरची गणपती मूर्ती फारच सुंदर आहे. खड्यांनी ही बाप्पाची मूर्ती सजवण्यात आली आहे. शिव ठाकरेच्या या घरच्या बाप्पाच्या आकर्षक मूर्तीवरुन नजरच हटत नाहीये.
दरम्यान, शिव हा टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अनेक रिएलिटी शोमधून ओळख मिळवली. 'रोडीज', 'बिग बॉस मराठी', 'बिग बॉस हिंदी', 'खतरों के खिलाडी' अशा रिएलिटी शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता. शिव ठाकरेचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे.