खुपते तिथे गुप्ते: 'हिंमत असेल तर समोर ये'; दाऊद इब्राहिमला समीर वानखेडेंचं खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:51 AM2023-07-31T11:51:48+5:302023-07-31T11:52:36+5:30

Sameer wankhede: 'त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही' असं म्हणत समीर वानखेडे यांनी दाऊद इब्राहिमविषयी रोखठोक भाष्य केलं आहे.

former-mumbai-ncb-chief-sameer-wankhede-talk-about-dawood-ibrahim-threat-call | खुपते तिथे गुप्ते: 'हिंमत असेल तर समोर ये'; दाऊद इब्राहिमला समीर वानखेडेंचं खुलं चॅलेंज

खुपते तिथे गुप्ते: 'हिंमत असेल तर समोर ये'; दाऊद इब्राहिमला समीर वानखेडेंचं खुलं चॅलेंज

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या विशेष गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे खुपते तिथे गुप्ते (khupte thithe gupte). जवळपास १२ वर्षानंतर अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) हा कार्यक्रम सुरु झाला आहे. मात्र, कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून तो तुफान गाजत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, सई ताम्हणकर, उर्मिला मातोंडकर अशा अनेक नावाजलेल्या आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. त्यानंतर आता लवकरच या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाऊद इब्राहिमला खुलं चॅलेंज दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. हा प्रोमो झी मराठीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दाऊद इब्राहिमविषय़ी प्रश्न विचारताच समीर वानखेडे यांनी त्याला 'हिंमत असेल तर समोर ये', असं म्हणत चॅलेंज दिलं आहे.

समीर वानखेडेंना दाऊद इब्राहिमकडून धमक्या येत आहेत, असं लोकं म्हणतात”, असा प्रश्न अवधूत गुप्तेने समीर वानखेडे यांना विचारला. त्यावर, उत्तर देताना, 'मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही', असं उत्तर त्यांनी दिलं. सोबतच 'समोर येऊन धमक्या द्या', असंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले समीर वानखेडे?

"आमच्यासाठी हे खूप लहान गुन्हेगार आहेत आणि त्यांचं नाव घेऊन मी त्यांना आणखी प्रसिद्ध करणार नाही. मी त्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. मी त्यांना चॅलेंज करतो, तिथे परदेशात बसून धमक्या वैगरे अजिबात देऊ नकोस, जर हिंमत असेल तर समोर येऊन धमक्या दे”, असं समीर वानखेडे म्हणाले.

दरम्यान, समीर वानखेडे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे हा भाग पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत.
 

Web Title: former-mumbai-ncb-chief-sameer-wankhede-talk-about-dawood-ibrahim-threat-call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.