पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:45 IST2024-06-01T16:45:00+5:302024-06-01T16:45:00+5:30

Marathi actress: या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.

First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo | पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा एक स्वतंत्र चाहतावर्ग असतो. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार मंडळी कायम प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे चाहते सुद्धा या कलाकारांविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर अनेकांना तिला ओळखता आलं नाही.

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा तरुण वयातील फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीने तिच्या कलागुणांच्या जोरावर मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर ती एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या कविता वाचनाचे कार्यक्रम सुद्धा करते. आज ही अभिनेत्री लोकप्रिय असली तरी सुद्धा तिचा फोटो पाहून अनेक जण तिला ओळखू शकले नाहीत. त्यामुळे ही अभिनेत्री नेमकी कोण असावी अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होतीये.

फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मधुराणी गोखले-प्रभुलकर आहे.  मधुराणी ज्यावेळी पहिल्यांदा मुंबईत आली. त्यावेळी तिने केलेल्या पहिल्या फोटोशूटमधला हा एक फोटो आहे. मधुराणीने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान, उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणारी मधुराणी सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Web Title: First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo