"आधी आपल्या इंडस्ट्रीत चांगलं काम करा आणि मग...", गौरव मोरे स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:58 IST2025-07-29T11:58:27+5:302025-07-29T11:58:55+5:30
Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता गौरव मोरे आता झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पाहायला मिळतो आहे.

"आधी आपल्या इंडस्ट्रीत चांगलं काम करा आणि मग...", गौरव मोरे स्पष्टच बोलला
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra)मधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) आता झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात पाहायला मिळतो आहे. यानिमित्ताने त्याने नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी गौरवने हिंदी किंवा इतर इंडस्ट्रीमध्ये काम करण्याबाबतचं त्याचं मत व्यक्त केलं.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरेने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याने इतर सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, ''मला नेहमी असं वाटतं की आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो ती आपली इंडस्ट्री आहे. तिथे आपण अगदी परिपक्व व्हायला पाहिजे. मग ते होणार की अरे तो तिकडे प्रसिद्ध आहे किंवा त्या रिजिनलमध्ये तो चांगलं काम करतो. मग आपोआप पसरत अमुक अमुक अभिनेता आहे किंवा अमुक अमुक अभिनेत्री आहे ना ती चांगलं काम करतो किंवा चांगले काम करते. तर वेगळा आदर मिळतो.'' गौरवचे हे म्हणणं अनेक नेटकऱ्यांना पटलं आहे. त्यामुळे ते त्याचे कौतुक करत आहेत.
वर्कफ्रंट
गौरव मोरेला महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याने हा शो सोडल्यानंतर अनेकजण त्याच्यावर नाराज झाले होते. आता जवळपास एक वर्षाच्या गॅपनंतर तो पुन्हा एकदा कॉमेडी शोमध्ये रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वात पाहायला मिळणार आहे.