'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीमुळे फॅन अडचणीत, पोलिसांनी दाखल केला FIR
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 17:22 IST2024-01-31T17:21:35+5:302024-01-31T17:22:01+5:30
'बिग बॉस १७' विजेता मुनव्वर फारुकीच्या फॅनविरोधात FIR दाखल; नेमकं प्रकरण काय?

'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीमुळे फॅन अडचणीत, पोलिसांनी दाखल केला FIR
'बिग बॉस १७'चा विजेता झाल्यानंतर कॉमेडियन मुनव्वर फारुकी चर्चेत आला आहे. 'बिग बॉस'नंतर मुनव्वरच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. रिएलिटी शोचा विजेता ठरल्यानंतर मुनव्वर ट्रॉफी घेऊन त्याच्या डोंगरीतील घरी गेला होता. तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. याचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, यामुळे मुनव्वरचा एक चाहता अडचणीत आला आहे.
मुनव्वरचा चाहता अरबाज युसुफ खानविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती फ्री प्रेस जनरलने दिली आहे. मुनव्वरच्या सेलिब्रेशनमध्ये गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी हा ड्रोन जप्त केल्याचीही माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.
दरम्यान, 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर जिकडेतिकडे मुनव्वरचीच चर्चा आहे. 'बिग बॉस'च्या विजेता ठरल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफीबरोबरच ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. याबरोबरच त्याला ह्युंडाई कंपनीची क्रेटा गाडीही मिळाली आहे.