फराह खाननेही दिला राखी सावंतला धीर, अंत्ययात्रेत कधी 'दुआ' तर कधी 'प्रार्थना' करताना दिसली राखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 17:05 IST2023-01-29T17:03:45+5:302023-01-29T17:05:47+5:30
फराह खानने राखीला धीर दिला. तिच्या गळयात पडून राखी ढसाढसा रडली.

फराह खाननेही दिला राखी सावंतला धीर, अंत्ययात्रेत कधी 'दुआ' तर कधी 'प्रार्थना' करताना दिसली राखी
Rakhee Sawant : अभिनेत्री राखी सावंत आईच्या निधनाने अक्षरश: कोसळली आहे. सध्या तिच्या आजुबाजुचे सर्वच तिला धीर देताना दिसत आहेत. राखीच्या आईच्या अंत्ययात्रेत अनेक सेलिब्रिटीही दाखल झाले. दरम्यान दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानही (Farah Khan) अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काल रात्री राखीच्या आईचे जया सावंत यांचे निधन झाले. राखीसाठी हे दु:ख पचवणे साहजिकच कठीण जात आहे. आज आईच्या अंत्ययात्रेत राखी कधी दुआ मागताना तर कधी प्रार्थना करताना दिसली. अंत्ययात्रेनंतर झालेल्या शोकसभेस फराह खान उपस्थित होती. फराहने राखीला धीर दिला. तिच्या गळयात पडून राखी ढसाढसा रडली.
राखीसोबत तिचा पती आदिल दुर्रानी आणि भाऊ राकेश सावंत दिसले. तसेच अभिनेत्री रश्मी देसाई देखील अंत्ययात्रेत दाखल झाली. अनेक सेलिब्रिटिंनी राखीला या कठीण प्रसंगी धीर दिला.
राखीची आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून ब्रेन ट्युमरशी लढा देत होती. काही दिवसांपासून आईला भेटतानाचे राखीचे व्हिडिओ समोर येत होते. त्यांची तब्येत खूपच खालावल्याचं त्यात स्पष्ट दिसत होतं. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.