"लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामांनंतर तूच..", कुशल बद्रिकेला मिळाली लाखमोलाची प्रतिक्रिया, उत्तर देत अभिनेता म्हणाला…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 18:31 IST2023-04-19T18:28:14+5:302023-04-19T18:31:30+5:30
आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मनं जिंकणारा कुशल बद्रिके (Kushal Badrike) त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत असतो.

"लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामांनंतर तूच..", कुशल बद्रिकेला मिळाली लाखमोलाची प्रतिक्रिया, उत्तर देत अभिनेता म्हणाला…
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) गेल्या कित्येक वर्षांपासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या शोमधील विनोदवीर आपल्या विनोदशैलीनं रसिकांना खळखळून हसायला भाग पाडतात.यातील विनोदवीर भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, निलेश साबळे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके घराघरात पोहचले आहेत. आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मनं जिंकणारा कुशल बद्रिके (Kushal Badrike) त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असतो.
गेले काही दिवस कुशल चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडन दौऱ्यावर होता. अशातच त्याचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. कुशलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेता ही या मध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आता त्याने पोस्ट केलेला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये कुशल एका मराठी रोमाँटिक गाण्यावर चालताना दिसत आहे. या स्लो मोशन व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने लिहिले, ''असलं एखादं गाणं आपल्यावर shoot व्हायला हवं यार. तो पर्यंत दुसऱ्यांच्या गाण्यांवर enjoy करत राहू.'' त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
व्हिडीओतील त्याचा हा अंदाज चाहत्यांना आवडला आहे. एकाने लिहिले, ''तु खरचं आमचा फेवरेट आहेस..माननिय अशोक मामांनतंर तुच आहेस..शुभेच्छा तुला कुशल मित्रा.'' तर दुसऱ्याने लिहिलं, ''जिथं तिथं याहा वाहा आहे फक्त दादाची हवा.तर आणखी एकाने लिहिले, ''लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामा नंतर तुचं आहेस रे भावा आम्हाला हसवणारा..'' या कमेंट्सवर कुशलनेही रेड हार्ट इमोजी देत देत चाहत्यांचे आभार मानले.