प्रसिद्ध युट्यूबर अभि आहे मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा; 'वादळवाट' मालिकेत केलंय तिने काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 16:16 IST2023-07-28T16:16:14+5:302023-07-28T16:16:50+5:30
Youtuber abhi and niyu:सध्या युट्यूबवर टॉप कॉन्टेट क्रिएटर्समध्ये अभि आणि नियू या जोडीचा प्रथम क्रमांक लागतो.

प्रसिद्ध युट्यूबर अभि आहे मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा; 'वादळवाट' मालिकेत केलंय तिने काम
गेल्या काही काळात युट्यूब हे सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम झालं आहे. कोणत्याही लहानातील लहान गोष्टीची माहिती एका क्लिकवर युट्यूबवर मिळते. विशेष म्हणजे युट्यूबवरचे व्हिडीओदेखील क्षणार्थात व्हायरल होतात. त्यामुळे सध्या युट्यूबवर कॉन्टेन्ट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्सची मोठी गर्दी पाहायला मिळते. यामध्येच सध्या एक लोकप्रिय आणि आघाडीचा युट्यूबर अभि चर्चेत आला आहे. अभि केवळ एक युट्यूबर नसून तो एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेक आहे.
सध्या युट्यूबवर टॉप कॉन्टेट क्रिएटर्समध्ये अभि आणि नियू या जोडीचा प्रथम क्रमांक लागतो. अभिराज आणि नियती हे दोघं वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडीओ तयार करत असतात. विशेष म्हणजे अभिराज एका अभिनेत्रीचा लेक आहे.
अभिराज प्रत्येक मुद्द्याचा नीट अभ्यास करुन तो मुद्दा प्रेक्षकांपर्यंत सविस्तरपणे मांडत असतो. त्यामुळेच त्याच्या फॉलोअर्सची संख्यादेखील जास्त आहे. अभिराज राजाध्यक्ष असं त्याचं पूर्ण नाव असून तो अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांचा लेक आहे. अनुराधा राजाध्यक्ष या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात वादळवाट, मिशन दोस्ती. com अशा काही मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत.