प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकित कालराचं निधन, 29 व्या वर्षीच झोपेतच आला हार्टॲटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:49 IST2024-08-23T13:49:14+5:302024-08-23T13:49:59+5:30

पत्नीने दिली माहिती, लग्नाला जेमतेम दीड वर्षच झालेलं

Famous social media influencer Ankit Kalra passed away at the age of 29 due to heart attack | प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकित कालराचं निधन, 29 व्या वर्षीच झोपेतच आला हार्टॲटॅक

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकित कालराचं निधन, 29 व्या वर्षीच झोपेतच आला हार्टॲटॅक

सोशल मीडियावरील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकित कालराचं (Ankit Kalra) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. अचानक निधन झालं आहे. वयाच्या केवळ 29 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अंकित त्याची पत्नी इंशा घईसोबत (Insha Ghaii) मजेशीर रील्स शेअर करायचा. त्यांचे रील व्हिडिओ तुफान व्हायरल व्हायचे. या कपलचे अनेक फॉलोअर्स आहेत. अंकितच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीय आणि लाखो  चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
 
अंकिता कालरा तरुण इन्फ्लुएन्सर होता ज्याच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतसं होतं. गेल्यावर्षीच त्याचं इंशासोबत लग्न झालं. लग्नानंतर एका वर्षातच अंकितचं निधन झालं आहे. झोपेतच त्याला हृयविकाराचा धक्का आला. हा इंशावर झालेला मोठा आघात आहे. तिला या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो अशीच प्रार्थना चाहते करत आहेत. २० ऑगस्ट रोजी इंशाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत पतीच्या   निधनाची बातमी दिली. यासोबतच तिने भावूक पोस्टही लिहिली. 'मला पुन्हा एक दिवस आधी घेऊन चल, मी सगळं नीट करेन. परत येते, प्लीज. मला तुझी आठवण येते.'


आज तिने आणखी एक पोस्ट शेअर करत लिहिले, "अंकित तू मला सोडून देवाघरी गेलास. हे बरोबर नाही. आपल्या लग्नाला दीडच वर्ष झालं होतं. ती सकाळ शेवटची असेल मला वाटलंही नव्हतं. मला अजूनही विश्वास बसत नाहीए. हे वाईट स्वप्न असावं असंच वाटतंय आणि मी स्वप्नातून जागी झाल्यानंतर तू बाजूला असशील. तुझं हृय बंद पडलं आणि त्यासोबत माझं जगणं थांबलं. आपले कितीतरी प्लॅन होते आणि आता मी तुझ्याशिवाय हरवली आहे. हे खोटं आहे. तू मला मागे सोडलंस, हे नुकसान कधीच भरुन निघणार नाही. स्वर्ग नशीबवान आहे कारण तू तिथे आहेस."


इंशाच्या या पोस्टवर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही चुकीची माहिती पसरवू नये अशी विनंती सोशल मीडियावरुन केली आहे.

Web Title: Famous social media influencer Ankit Kalra passed away at the age of 29 due to heart attack