सहकुटुंब सहपरिवार: सरिताचं आई होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; सुर्या-सरिताच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 15:00 IST2022-01-16T14:59:50+5:302022-01-16T15:00:57+5:30

Sahkutumb sahaparivar: अवनी तिच्या बाळाच्या देखभालीची जबाबदारी सरितावर सोपवते. परंतु, आता सरिताच प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आहे.

Family: Sarita's dream of becoming a mother will come true; A new guest will come in Surya-Sarita's life | सहकुटुंब सहपरिवार: सरिताचं आई होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; सुर्या-सरिताच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा

सहकुटुंब सहपरिवार: सरिताचं आई होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; सुर्या-सरिताच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा

छोट्या पडद्यावरील 'सहकुटुंब सहपरिवार' (sahkutumb sahaparivar) या मालिकेत सध्या मोरे कुटुंबात आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे पश्या इंग्रजी बोलायला शिकला आहे. तर दुसरीकडे अवनीने बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या बाळाची खरी आई सरिता असल्याचं म्हणत अवनी तिच्या बाळाच्या देखभालीची जबाबदारीही सरितावरच सोपवते. परंतु, या मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. कित्येक वर्षांपासून आई होण्याची आतुरतेने वाट पाहणारी सरिता खरोखरच आई होणार आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सरिताला कोरड्या उलट्या होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर डॉक्टरदेखील तिला फोन करुन लवकरच ती आई होणार असल्याची गोड बातमी देतात. 

दरम्यान,  काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अवनी आई झाली आहे. तिने एका गोड बाळाला जन्म दिला असून या बाळाची खरी आई सरिताच असल्याचं तिने म्हटलं होतं. तसंच बाळाच्या संगोपनाची जबाबदारीही तिच्यावरच सोपवली होती. परंतु, आता सरिता स्वत:च प्रेग्नंट असल्यामुळे या मालिकेत कोणतं नवं वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
 

Web Title: Family: Sarita's dream of becoming a mother will come true; A new guest will come in Surya-Sarita's life