देवमाणूस मधल्या डॉक्टरवरही चढला पुष्पा फिव्हर म्हणतो, नटवर..डॉक्टर.. मैं रुकेगा नही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:47 IST2022-02-09T15:31:33+5:302022-02-09T15:47:13+5:30

सध्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटाची हवा संपूर्ण देशात पसरली आहे.

Even the doctor in 'Devmanus', Pushpa Fever | देवमाणूस मधल्या डॉक्टरवरही चढला पुष्पा फिव्हर म्हणतो, नटवर..डॉक्टर.. मैं रुकेगा नही

देवमाणूस मधल्या डॉक्टरवरही चढला पुष्पा फिव्हर म्हणतो, नटवर..डॉक्टर.. मैं रुकेगा नही

सध्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटाची हवा संपूर्ण देशात पसरली आहे. या चित्रपटातील गाणी आणि संवाद हे सगळ्यांच्या ओठावर रुळले आहेत. याच चित्रपटातील एका डायलॉगवर सध्या खूप मिम्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका देवमाणूस मधील अजितकुमार देव या व्यक्तिरेखेलासुद्धा पुष्पा प्रमाणेच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यामुळे पुष्पाच्या डायलॉग्सवर देवमाणसाचे मिम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुष्पाच्या अंदाजमधील डायलॉग अजितकुमार काहीसा असा म्हणतो - "देवमाणूस नाम सूनके भगवान समझा क्या? भगवान नाही दानव है में" या मिमवर नेटिझन्स आपल्या कमेंट्सच्या रूपाने भरभरून प्रतिसाद देत आहेत. चाहते प्रेक्षक या मिमचा आनंद घेत आहेत पण देवमाणूसची प्रमुख भूमिका निभावणार अभिनेता किरण गायकवाड याला देखील हा मिम इतका आवडला कि त्याने देखील आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.

देवमाणूसमधील किरण गायकवाडच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. . किरण गायकवाडने २०१७ साली ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैयासाहेबची भूमिका साकारली होती. त्यानंतर २०२० मध्ये देवमाणूस मालिकेत किरणला अजितकुमार देवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतील त्याची नकारात्मक भूमिका तुफान गाजली.

Web Title: Even the doctor in 'Devmanus', Pushpa Fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.