एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज! अभिनेत्री म्हणाली "I Love You"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 09:17 IST2026-03-08T09:16:12+5:302026-03-08T09:17:13+5:30

एल्विश यादव अन् जिया शंकर अडकणार लग्नबंधनात? भर शोमध्ये युट्यूबरने केलं प्रपोज

elvish yadav proposes jia shankar engaged season 2 viral video | एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज! अभिनेत्री म्हणाली "I Love You"

एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज! अभिनेत्री म्हणाली "I Love You"

अभिनेत्री जिया शंकरचे वैयक्तिक आयुष्य अलिकडेच अनेक डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहे. सुरुवातीला, अभिषेक मल्हानसोबत अभिनेत्रीच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली  होती. त्यानंतर तिने एक मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला, जो प्रचंड व्हायरल झाला. आता, एल्विश यादवने एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये जियाला एका गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  "तू माझ्याशी लग्न करशील का?" या एल्विशच्या प्रश्नावर जियाने होकार दिल्याचं पाहायला मिळालं.  मात्र, या प्रपोजलमागचे सत्य काही वेगळेच समोर येत आहे.

सध्या एल्विश यादव 'एंगेज्ड सीझन २' (Engaged Season 2) हा शो होस्ट करत आहे. या शोच्या एका विशेष भागात एल्विशने हातात लाल गुलाब घेऊन जियाला विचारलं, "तू माझ्याशी लग्न करशील का?" त्यावर जियाने हसून उत्तर दिलं, "मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी तुझ्याशी लग्न करेन". ही क्लिप व्हायरल होताच चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. काहींना हे खरं वाटलं, तर काहींनी हा शोचा एक भाग असल्याचा दावा केला.

पब्लिसिटी की खरं प्रेम? 
या प्रपोजलची चर्चा रंगली असतानाच, जिया शंकरने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. जिया म्हणाली की, "आमच्या दोन्ही कुटुंबांना माहित होतं की हे केवळ प्रसिद्धीच्या (Publicity) उद्देशाने केलं गेलं आहे, त्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटलं नाही". जियाने हे स्पष्ट केलं की हा शोच्या पटकथेचा (Script) एक भाग होता.

दोघांच्या खासगी आयुष्यात वेगळीच व्यक्ती?
विशेष म्हणजे, एल्विश यादवने आधीच 'लाफ्टर शेफ्स ३' मध्ये तो रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली आहे, पण त्याने त्या मुलीची ओळख गुप्त ठेवली. दुसरीकडे, जिया शंकरने ३१ डिसेंबर २०२५ रोजी ती कोणालातरी डेट करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. मात्र, आता जियाने सांगितलं आहे की तिचा त्या व्यक्तीसोबत ब्रेकअप झालं असून तिने पुन्हा प्रेमाला संधी दिली आहे.

Web Title : एल्विश यादव ने जिया शंकर को किया प्रपोज, अभिनेत्री ने कहा 'आई लव यू'.

Web Summary : एल्विश यादव ने 'एंगेज्ड सीजन 2' में जिया शंकर को प्रपोज किया। जिया ने स्वीकार किया, लेकिन स्पष्ट किया कि यह प्रचार के लिए था। दोनों के अलग-अलग पार्टनर हैं।

Web Title : Elvish Yadav proposes to Jiya Shankar; actress says 'I Love You'.

Web Summary : Elvish Yadav proposed to Jiya Shankar on 'Engaged Season 2'. Jiya accepted, but clarified it was for publicity. Both have separate partners.