चला…काहीतरी नवीन करूया! डॉ. निलेश साबळेची पोस्ट चर्चेत, फोटोवरही चाहत्यांच्या कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:27 IST2026-02-25T12:26:45+5:302026-02-25T12:27:12+5:30
निलेश साबळेची पोस्ट चर्चेत, आता काय नवीन?

चला…काहीतरी नवीन करूया! डॉ. निलेश साबळेची पोस्ट चर्चेत, फोटोवरही चाहत्यांच्या कमेंट्स
कसे आहात मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे... अशी सुरुवात करणारा सर्वांचा लाडका डॉ निलेश साबळे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. 'चला हवा येऊ द्या' हा लोकप्रिय कार्यक्रम १० वर्ष यशस्वी चालला. निलेश साबळे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तसंच लेखकही होता. मराठीच नाही तर हिंदी कलाकारांनीही कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान कार्यक्रमाने १० वर्षांनंतर निरोप घेतला. मधल्या काळात निलेश साबळेने पुन्हा भाऊ कदमसोबत एक शो सुरु केला होता मात्र तोही बंद पडला. आता त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे जी चर्चेत आहे.
डॉ निलेश साबळेने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो सूट घालून खुर्चीवर बसला आहे. डोळ्यावर चष्मा आहे. अभ्यासू असा त्याचा हा लूक दिसतोय. यासोबत त्याने लिहिले,'नवा दिवस… नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…!!!'
निलेश साबळे काय नवीन घेऊन येतोय याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.'हा लूक तुम्हाला शोभून दिसतो','नवीन शो मध्ये नवीन कलाकारांना संधी दिली तर बर होईल,'तुम्ही काय नवीन करणार आहात.... उत्सुकता आहे... लवकर कळवा doctor','अहो त्या भाऊ ला कुठं गायब केला तुम्ही ' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.