'आज तरी नको भांडायला'; रक्षाबंधनाच्या दिवशी अभिषेकने केली अमृताला मजेशीर विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 18:00 IST2022-08-11T18:00:00+5:302022-08-11T18:00:00+5:30

Abhishek deshmukh: मालिकेमध्ये यश ही भूमिका साकारणारा अभिषेक सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम त्याच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

Don't fight today On the day of Raksha Bandhan Abhishek made a funny request to Amruta | 'आज तरी नको भांडायला'; रक्षाबंधनाच्या दिवशी अभिषेकने केली अमृताला मजेशीर विनंती

'आज तरी नको भांडायला'; रक्षाबंधनाच्या दिवशी अभिषेकने केली अमृताला मजेशीर विनंती

 बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. त्यामुळेच आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हा दिवस साजरा करण्यात बिझी आहे. यात अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावंडांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यात अभिषेक देशमुखदेखील (abhishek deshmukh) मागे नाही. 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिषेकने त्याच्या बहिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मालिकेमध्ये यश ही भूमिका साकारणारा अभिषेक सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम त्याच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यात त्याने रक्षाबंधनानिमित्त त्याच्या बहिणीसाठी म्हणजेच अभिनेत्री अमृता देशमुखसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

अभिषेकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्यासोबत अमृता दिसत असून या पोस्टला त्याने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. "रक्षाबंधन (आज तरी नको भांडायला) दिवसाच्या शुभेच्छा! लवकरच भेटू!", असं कॅप्शन अभिषेकने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, अभिषेकची बहीण असलेली अमृता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अमृता आरजे म्हणून नव्या क्षेत्रात नशीब आजमावत आहे.
 

Web Title: Don't fight today On the day of Raksha Bandhan Abhishek made a funny request to Amruta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.