फोटोत दिसणाऱ्या या क्युट मुलीला ओळखलंत का? मराठीसह साऊथमध्ये आहे तिचा दबदबा, ओळखा पाहू कोण आहे ती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 07:00 IST2023-03-29T07:00:00+5:302023-03-29T07:00:06+5:30
फोटोत दिसणारी ही चिमुकली फक्त मराठी इंडस्ट्री नाहीत तर साऊथमधील देखील प्रसिद्ध चेहरा आहे.

फोटोत दिसणाऱ्या या क्युट मुलीला ओळखलंत का? मराठीसह साऊथमध्ये आहे तिचा दबदबा, ओळखा पाहू कोण आहे ती ?
गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींचा बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.. फोटोत दिसणारी ही चिमुकली फक्त मराठी इंडस्ट्री नाहीत तर साऊथमधील देखील प्रसिद्ध चेहरा आहे.
श्रुती मराठेने (shruti marathe) तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
श्रुती अभिनेता आणि पती गौरव घाटणेकरसह निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. झी मराठीवर सुरु असलेल्या 'नवा गडी नवं राज्य' मालिकेची निर्मिती त्यांनी केली आहे. श्रुतीचा पती गौरव घाटणेकर ही मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.