टॉम बॉय लूकमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये करतीये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 18:37 IST2023-04-05T18:37:25+5:302023-04-05T18:37:51+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे १९९७ सालचे तिचे फोटो शेअर केले आहेत.

टॉम बॉय लूकमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये करतीये काम
आपण कितीही मोठे झालो तरीदेखील बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला प्रत्येकालाच आवडतं. याला सेलिब्रिटीदेखील अपवाद नाहीत. अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या लहानपणीचे फोटो, व्हिडीओ शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. यामध्येच सध्या पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेच्या कलाकारांनी नवा ट्रेंड सुरु केला आहे. विशेष म्हणजे या ट्रेंडला अन्य कलाकारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत त्यांचे १९९७ सालचे फोटो शेअर केले आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.
जुने फोटो पुन्हा शेअर करण्याच्या या नव्या ट्रेंडमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत अनेक कलाकारांनी त्यांचे जुने फोटो शेअर केले आहेत. यात सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे १९९७ सालचे तिचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोकडे पाहून तिला ओळखणं कठीण झालं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हिचे आहेत. रसिकाने तिचे तीन फोटो शेअर केले आहेत. यात एकामध्ये तिने फ्रॉक घातला आहे. तर, एकामध्ये जीन्स आणि शर्ट घातला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची वेगळी दिसत असून तिला ओळखणं तसं अवघड आहे.
"पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा", असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहे. सोबतच तिने तिच्या काही मित्रमैत्रिणींना टॅगही केलं आहे.