टोपी घातलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांमध्ये आहे लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 08:00 IST2022-05-25T08:00:00+5:302022-05-25T08:00:01+5:30

Marathi actor: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या लहान मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने डोक्यावर टोपी घातली असून तो पांढऱ्या  रंगाच्या शर्टमध्ये दिसून येत आहे.

do you know this boy in photo now he is famous actor in marathi industry | टोपी घातलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांमध्ये आहे लोकप्रिय

टोपी घातलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांमध्ये आहे लोकप्रिय

गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड व्हायरल झाला आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत आहेत. यात साधारणपणे कलाकारांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींचे थ्रोबॅक फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र, यावेळी एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या लहान मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने डोक्यावर टोपी घातली असून तो पांढऱ्या  रंगाच्या शर्टमध्ये दिसून येत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या चेहऱ्यावरच्या निरागस हास्याचं कौतुक केलं आहे. सोबतच हा चिमुकला कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फोटोत दिसणारा हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता, सूत्रसंचालक आदेश बांदेकर (aadesh bandekar) आहेत. अनेक मालिका, नाटकांमध्ये काम करणारे आदेश बांदेकर आज महाराष्ट्राचे लाडके भावजी म्हणून ओळखले जातात. होम मिनिस्टर या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले आणि लोकप्रिय झाले. 

Web Title: do you know this boy in photo now he is famous actor in marathi industry