चॅलेंज ! डेनिम फ्रॉकमध्ये उभी असलेल्या मुलीला ओळखलंत का ?, आज ही आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:32 IST2022-03-04T13:29:27+5:302022-03-04T13:32:41+5:30
सेलिब्रिटींच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.

चॅलेंज ! डेनिम फ्रॉकमध्ये उभी असलेल्या मुलीला ओळखलंत का ?, आज ही आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री
सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो पाहताना चाहते हरकून जातात. सध्या सोशल मीडियावर असे असंख्य फोटो व्हायरल होताना दिसतात. बरेच चाहते सेलिब्रिटींना फॉलो करतात. सेलिब्रिटींच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. त्यामुळे सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही व्हायरल होत असतात. आता असाच एक फोटो व्हायरल होतोय. डेनिम फ्रॉक घातलेली एक क्युट चिमुकली या फोटोत दिसतेय. ती कॅमेऱ्याकडे पाहून हातांशी खेळताना दिसतेय. ही चिमुकली कोण ? तुम्ही ओळखलंत का?
ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून टेलिव्हजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल आहे. शहनाज टीव्हीवरील एक क्युट अभिनेत्री आहे . पंजाबची कतरिना कैफ म्हणून सुरुवातील शहनाजची ओळख निर्माण झाली होती.
When everything was so wonderful .and life was so simple !! pic.twitter.com/9TJ9b54ANm
— Shehnaaz Gill (@ishehnaaz_gill) March 3, 2022
बिग बॉसनंतर शहनाजमध्ये खूप चेंजस झाले आहेत. तिचं झालेलं ट्रान्सफोर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाजला धक्का बसला होता. आता ती स्वतःची काळजी घेत आहे आणि कामावर परतली आहे. नुकतीच ती बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये आली होती. जिथे त्यांनी सिद्धार्थ शुक्ला यांना श्रद्धांजली वाहिली. शहनाजने यशराज मुखातेसोबत एक गाणं शूट केलं. या गाण्यात शहनाजने स्वत:चा आवाज दिला आहे.