'दिया और बाती हम"फेम संध्या बिंदणीचा रावडी अंदाज, मार्शल आर्टचे घेतले धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:14 IST2026-03-14T12:12:00+5:302026-03-14T12:14:33+5:30
Deepika singh: उत्तम अभिनयकौशल्य असलेली दीपिका सध्या मार्शल आर्ट्सचे धडे गिरवत आहे. याचे काही फोटोदेखील तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

'दिया और बाती हम"फेम संध्या बिंदणीचा रावडी अंदाज, मार्शल आर्टचे घेतले धडे
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'दिया और बाती हम. ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेमुळे अभिनेत्री दीपिका सिंह (deepika singh) खऱ्या अर्थाने नावारुपाला आली. या मालिकेत संध्या बिंदणी ही मुख्य भूमिका साकारुन ती तुफान लोकप्रिय झाली. दीपिका सोशल मीडियावर सक्रीय असून तिची एक नवीन पोस्ट चर्चेत आली आहे.
उत्तम अभिनयकौशल्य असलेली दीपिका सध्या मार्शल आर्ट्सचे धडे गिरवत आहे. याचे काही फोटोदेखील तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अलिकडेच दीपिकाने तिचे मार्शल आर्ट्स करतांनाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोमध्ये ती मार्शल आर्ट्सच्या मुव्ह्स करतांना दिसत आहे. सोबतच तिने दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
''मी आज भक्कम आहे. कारण, कधी काळी मी खूप कमजोर होते. मी निडर आहे. कारण, मी भितीचा सामना केला आहे. मी समजूतदार आहे, कारण,माझ्याकडून चुकाही झाल्यात. मार्शल आर्ट्सचा खरा अर्थ म्हणजे मन आणि शरीरावर नियंत्रण मिळवणं'', असं कॅप्शन दीपिकाने दिलं आहे.
दरम्यान, दीपिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. दीपिकाला नवनवीन गोष्टी शिकण्याची विशेष आवड आहे. मार्शल आर्ट्सपूर्वी तिने ओडिसी नृत्याचे धडे गिरवले आहेत.