दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:11 AM2024-04-19T10:11:38+5:302024-04-19T10:12:33+5:30

'ये है मोहोब्बते' मधून दिव्यांकाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

Divyanka Tripathi met with an accident two bones of her arm are broken Vivek Dahiya request to pray | दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन

दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन

'ये है मोहोब्बते' हिंदी मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा (Divyanka Tripathi) अपघात झाला आहे. तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून दोन हाडं निखळली आहे. आज तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिव्यांकाचा पती अभिनेता विवेक दहियाने (Vivek Dahiya) सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली. काल रात्रीच तिच्या अपघाताची बातमी समोर आली आहे.

अभिनेता विवेक दहिया आज चाहत्यांसोबत लाईव्ह सेशन घेणार होता. मात्र रात्री त्याने सेशन रद्द करत असल्याचं सांगितलं. विवेकच्या टीमने स्टोरी शेअर करत लिहिले, "उद्या होणारं विवेकचं लाईव्ह पुढे ढकलत आहोत. दिव्यांकाचा काही तासांपूर्वीच अपघात झाला आहे. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विवेक तिची काळजी घेत रुग्णालयातच आहे. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा. दिव्यांकाच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करा. विवेक लवकरच तुमच्याशी संवाद साधेल."

तर आणखी एका पोस्टमध्ये टीमने लिहिले, "दिव्यांका मॅडमच्या हाताचे दोन हाड निखळले आहेत. तिच्यावर उद्या सर्जरी होणार आहे. काळजी करण्याचं कारण नसून ती सुरक्षित ठिकाणी आहे."

दिव्यांकाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं तिच्या एक्स रे फोटोवरुन स्पष्ट होत आहे. दिव्यांकाचे चाहते चिंतेत पडले असून तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. दिव्यांकाची 'अदृश्यम' ही वेबसीरिज नुकतीच काही महिन्यांपूर्वी रिलीज झाली. यामध्ये तिने अॅक्शन सीन्स दिले आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्टसाठीही चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Divyanka Tripathi met with an accident two bones of her arm are broken Vivek Dahiya request to pray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.