'ये है मोहोब्बते'च्या इशिताला मिळत नाहीए काम, टीव्हीवर कमबॅक करण्याची दिव्यांकाची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:30 IST2024-04-24T11:29:16+5:302024-04-24T11:30:03+5:30

काही दिवसांपूर्वीच तिचा अपघात झाला ज्यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आता तिची तब्येत बरी असून पुन्हा काम शोधत आहे.

Divyanka Tripathi in search of work says she wants to comeback in television | 'ये है मोहोब्बते'च्या इशिताला मिळत नाहीए काम, टीव्हीवर कमबॅक करण्याची दिव्यांकाची इच्छा

'ये है मोहोब्बते'च्या इशिताला मिळत नाहीए काम, टीव्हीवर कमबॅक करण्याची दिव्यांकाची इच्छा

'ये है मोहोब्बते' मालिकेतून इशिता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आता कामाच्या शोधात आहे. दिव्यांका नुकतीच 'अदृश्यम' वेबसीरिजमध्ये दिसली. मात्र आता तिला मनासारखं काम मिळत नाहीए. दिव्यांकाला पुन्हा टेलिव्हिनजवर येण्याचीही इच्छा आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा अपघात झाला ज्यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आता तिची तब्येत बरी असून पुन्हा काम शोधत आहे.

दिव्यांका त्रिपाठीने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील करिअरविषयी बातचीच केली. ती म्हणाली, "माझ्यासाठी भूमिका महत्वाची नाही फक्त ती इंटरेस्टिंग असली पाहिजे जे करताना मजा येईल. मला टीव्हीसाठी भूमिका तर मिळत आहेत पण मला आवडतील असे येत नाहीयेत. ज्या भूमिका मला ऑफर येत आहेत पण त्या योग्य पद्धतीने लिहिल्या गेल्या नाहीत असं मला वाटतं. टीव्हीमुळेच मी अभिनय क्षेत्रात येऊ शकले. मला टीव्ही माध्यमामुळे खूप शिकायला मिळालं. त्यापेक्षा जास्त चांगलीच कोणतीच अभिनय कार्यशाळा नाही."

ती पुढे म्हणाली, "ये है मोहोब्बते मध्ये माझी भूमिका खूपच सोपी होती. मेकर्स प्रत्येक गोष्टीत स्पष्ट होते. आमची मालिका टीआरपीमध्ये टॉपवर होती. पण सध्या मला अशी स्पष्ट भूमिका मिळत नाहीए. मला पुन्हा टीव्हीवर यायचं आहे. मी आजपर्यंत जे केलं नाही असं काम मला करायचंय."

Web Title: Divyanka Tripathi in search of work says she wants to comeback in television