"दिशा वकानी दयाबेन बनून परत येणार होती, पण...", 'तारक मेहता...' फेम जेनिफरचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:48 IST2025-07-29T16:48:24+5:302025-07-29T16:48:53+5:30
काही वर्षांपूर्वीच दिशाने प्रेग्नंन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर दयाबेन मालिकेत दिसलीच नाही. अनकेदा दयाबेन हे पात्र मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, या केवळ चर्चाच राहिल्या.

"दिशा वकानी दयाबेन बनून परत येणार होती, पण...", 'तारक मेहता...' फेम जेनिफरचा मोठा खुलासा
'तारक मेहता का उलटा चष्मा' हा टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचा अत्यंत लाडका शो. या मालिकेमधील गोकुळधाम सोसायटी प्रेक्षकांना आपलीशी वाटते. ' तारक मेहता...'मधील सगळीच पात्र चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानीने सगळ्यांचीच मनं जिंकली. पण, काही वर्षांपूर्वीच दिशाने प्रेग्नंन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर दयाबेन मालिकेत दिसलीच नाही. अनकेदा दयाबेन हे पात्र मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, या केवळ चर्चाच राहिल्या.
पण, मालिका सोडल्यानंतर दिशा वकानी पुन्हा दयाबेन म्हणून परतणार होती. तारक मेहता मालिकेत रोशनी सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने हा खुलासा पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. जेनिफर म्हणाली, "मालिकेत दयाबेन परत येऊ शकते पण आता दिशा येणार नाही. मला वाटत नाही ती परत येईल. दोन मुलं असल्यामुळे ती इतका वेळ देऊ शकेल असं वाटत नाही. ती मालिकेत दयाबेन म्हणून येणारही होती. लॉकडाऊनच्या नंतर दिशा सेटवरही आली होती. मी उद्यापासून येणार आहे, असं ती आम्हाला बोललीही होती. कपड्यांचं माप ती देऊन गेली होती. पण, त्यानंतर काय झालं ते कोणालाच माहीत नाही. त्यानंतर मला तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल कळलं. हे समजल्यानंतर प्रोडक्शन टीमलाही धक्का बसला होता. कारण, आता ती परत येण्याची शक्यता नाही".
दरम्यान, दिशा वकानीने दयाबेन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. दिशाने ब्रेक घेतल्यानंतर ती पुन्हा मालिकेत परतली नाही. अनेकदा टीमने तिच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय दयाबेन म्हणून दुसरी अभिनेत्री आणण्याच्या विचारात असित मोदी होते. मात्र दयाबेन या भूमिकेला सूट होईल अशी अभिनेत्रीच मिळाली नाही.