"तुम्ही जर किंचाळलात तर तुमचं बाळ..."; 'दयाबेन' फेम दिशा वकानीने सांगितला गरोदरपणाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:01 IST2025-03-03T16:00:36+5:302025-03-03T16:01:14+5:30

चेहऱ्यावर सुरकुत्या, भगवं उपरणं अन्..; 'दयाबेन'चा वेगळाच अवतार बघून चाहत्यांना धक्का. अभिनेत्रीने सांगितला गरोदरपणाचा अनुभव (disha vakani)

disha vakani aka dayaben in tarak mehta ka ooltah chashmah talk about pregnancy experience | "तुम्ही जर किंचाळलात तर तुमचं बाळ..."; 'दयाबेन' फेम दिशा वकानीने सांगितला गरोदरपणाचा अनुभव

"तुम्ही जर किंचाळलात तर तुमचं बाळ..."; 'दयाबेन' फेम दिशा वकानीने सांगितला गरोदरपणाचा अनुभव

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी. (disha vakani) दिशाने १०-१५ वर्ष प्रेक्षकांचं चांगलं मन जिंकलं. २०१७-१८ मध्ये दिशाने 'तारक मेहता का उलटा चष्मा'ला (tarak mehta ka ooltah chashmah) शोला रामराम ठोकला. त्यानंतर अशी अटकळ बांधली जात होती की, दिशा पुन्हा 'दयाबेन' म्हणून कमबॅक करेल. पण तसं काही झालेलं दिसत नाही. अशातच दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कपाळावर सुरकुत्या, अंगावर भगवं उपरणं असा दिशाचा वेगळाच अवतार पाहायला मिळतोय.

दिशाने सांगितला गरोदरपणाचा अनुभव

दिशाने प्रेग्नंसीच्या काळात 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून ब्रेक घेतला. त्यानंतर दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. अशातच व्हायरल व्हिडीओत दिशा गायत्री मंत्राचं महत्व सर्वांना सांगताना दिसतेय. दिशा म्हणाली की, "मी जेव्हा पहिल्यांदा आई झाली तेव्हा प्रेग्नंसीच्या वेळेस खूप त्रास झाला होता. डिलिव्हरीच्या वेळेस खूप त्रास आणि खूप भिती वाटत होती.परंतु गर्भसंस्काराचा कोर्स मी केला होता. डिलिव्हरीच्या वेळेस मला सांगण्यात आलं होतं की, तुम्ही आई आहात तुम्हाला ओरडायचं नाहीये. तुम्ही जर किंचाळलात तर तुमच्या गर्भातलं बाळ घाबरेल. त्यावेळी गायत्री मातेचा मंत्र मी उच्चारला आणि हसतखेळत माझी डिलिव्हरी झाली."


अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, "मी मनात सातत्याने गायत्री मंत्राचं स्मरण करत होती. माझे डोळे बंद होते अन् मी हसत होते. पुढे माझी मुलगी जन्माला आली. तिचं नाव स्तुती. मला प्रत्येक आईला सांगावंसं वाटतं की, हा मंत्र उच्चारल्याने एक वेगळ्या प्रकारची शक्ती मिळते. प्रेग्नंसीच्या वेळी हा मंत्र प्रत्येक आईसाठी एक चमत्कार आहे. हे तुम्हाला कायम लक्षात राहील." 'दयाबेन' अर्थात दिशा वकानी 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये कमबॅक करणार, याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे.

Web Title: disha vakani aka dayaben in tarak mehta ka ooltah chashmah talk about pregnancy experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.