दिप्ती केतकरची छोट्या पडद्यावर पुन्हा दमदार एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:40 IST2023-07-13T14:39:54+5:302023-07-13T14:40:19+5:30
Dipti Ketkar: 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत दिप्ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

दिप्ती केतकरची छोट्या पडद्यावर पुन्हा दमदार एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत
सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे सध्या मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच काही नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर, काही जुनेच कलाकार नव्या रुपात प्रेक्षकांना दिसत आहेत. यामध्येच आता अभिनेत्री दिप्ती केतकर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ती नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
सोनी मराठीवर 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी विविध व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री दिप्ती केतकरदेखील या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून तो राजवीर ही भूमिका वठवणार आहे. तसंच अभिनेत्री जान्हवी तांबट ही अजिंक्यसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. यामध्येच दिप्तीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या नव्या मालिकेतून ती एका विशिष्ट व्यक्तिरेखेद्वारे आपल्या भेटीस येते आहे. यामिनी सराफ असे त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून राजवीरच्या आईच्या भूमिकेत ती असणार आहे. यामिनी या मालिकेतून नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आता ही व्यक्तिरेखा ती कशी फुलवते आणि राजवीर आणि मयूरी यांच्या आयुष्यात ती किती ढवळाढवळ करते, हे आपल्याला पाहायला मिळेल.