'उंच माझा झोका'मधील चिमुकली झालीय आता इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:10 IST2022-02-08T13:52:15+5:302022-02-08T14:10:22+5:30
अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात.

'उंच माझा झोका'मधील चिमुकली झालीय आता इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क!
अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अशाच एका बालकलाकारबाबत आपण आज जाणून घेणरा आहोत. 2011मध्ये झी मराठीवर 'उंच माझा झोका' (Unch Maza Zoka) ही मालिका प्रंचड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचं चरित्र पहिल्यांदाच छोट्या दाखवण्यात आलं. ‘उंच माझा झोका’ या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते छोट्या रमाबाईंनी.
मालिकेत छोट्या रमाबाईंची भूमिका तेजश्री वालावलकर(Tejashree Walawalkar)ने साकारली होती. या मालिकेमुळे तेजश्री घराघरात पोहोचली. तिला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. मात्र आता हीच तेजश्री करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही. आज तिचा बदललेला लूक पाहून आपण पहातच राहाल.
लहानपणापासून तेजश्री कलेशी जोडली गेली आहे. तेजश्रीला लिखाणाची आवड आहे. तिने दोन बालनाट्येसुद्धा लिहिली आहेत. भालबा केळकर प्रतिष्ठानतर्फे तिने सादरही केली होती. ‘हो, मला जमेल’ आणि ‘दहीहंडी’ ही ती दोन नाटके. ती दिग्दर्शित केली आणि त्यात अभिनयही केला होता.
अस्मिता चित्रच्या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्यासह काम केले होते. 2010 मध्ये मी ‘आजी आणि नात’ या चित्रपटातही ती झळकली होती. तेव्हा सुलभा देशपांडे आजी होत्या. 2010 मध्ये शाहू मोडक प्रतिष्ठानचा पुरस्कारही तिने मिळवला आहे.