ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांकच्या खऱ्या आयुष्यातील अप्पूला पाहिलंत का? तीसुद्धा आहे अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 06:00 IST2022-03-17T06:00:00+5:302022-03-17T06:00:02+5:30
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत शशांक आणि अप्पूची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते आहे. आज आम्ही तुम्हाला शंशाकच्या रिअल लाईफ अप्पूविषयी सांगणार आहोत.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांकच्या खऱ्या आयुष्यातील अप्पूला पाहिलंत का? तीसुद्धा आहे अभिनेत्री
सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli ) या मालिकेतील शंशाक उर्फ चेतन वडनेरेविषयी सांगणार आहोत.
अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadnere) स्टर प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत शंशाकची भूमिका साकारतो आहे. यातील त्याची आणि अप्पूची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेदेखील आहे. आज आम्ही तुम्हाला शंशाकच्या खऱ्या आयुष्यातील अप्पूविषयी सांगणार आहोत. चेतन मराठमोळी अभिनेत्री ऋजुता धारप (Rujuta Dharap) हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. चेतन आणि ऋजुता सोशल मीडियावर अनेकवेळा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
अभिनेता चेतन वडनेरे हा झी मराठीवरील ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. चेतन मूळचा नाशिकचा आहे. अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत आला. नाटक, एकांकिका गाजवत असताना स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत त्याला छोटीशी भूमिका मिळाली होती. यानंतर झी युवा वरील ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय मालिकेत तो झळकला होता.
ऋतुजाबद्दल सांगायचं तर ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत निगेटीव्ह भूमिकेत तुम्ही तिला पाहिलं असेलच. याशिवाय वर्तुळ, क्राईम पॅशन, घरात मॅरीड बाहेर बॅचलर अशा मालिका आणि नाटकांमधून ऋजुतानं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती सन टीव्ही मराठी या वाहिनीवरील ‘जाऊ नको दूर बाबा’ या मालिकेत काम करतेय.